दीपक भातुसे
मुंबई : राज्यातील महायुती सरकारच्या मंत्र्यांपैकी अनेकांनी शासकीय बंगल्यात वास्तव्याला येण्याआधी बंगल्यांचे नूतनीकरण करून घेतले होते. मात्र, मागील पाच महिन्यांत नूतनीकरणावर तब्बल ३० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.
वें. ल. पाटील यांनी ही माहिती समोर आणली असून, या प्रकरणी त्यांनी विभागाच्या सचिवांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि बांधकाम सचिव संजय दशपुते यांना प्रस्तुत प्रतिनिधीने प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.
मंत्री बंगल्याच्या नावावर काढण्यात आलेली ६० टक्के कामे ही कागदोपत्री असून, बोगस आहेत. उर्वरित कामांपैकी ३० टक्केच खरी कामाची
किंमत असून, ७० टक्के अंदाजपत्रक फुगविण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व निविदा रद्द केल्या पाहिजे.
- वें. ल. पाटील, तक्रारदार
नूतनीकरण वेगळे, रंगकाम वेगळे
मंत्रालयासमोरील बंगल्यांचे पुन्हा रंगकाम करण्यासाठी १ कोटी ५ लाखांच्या स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या आहेत.
मागील पाच महिन्यांत काढण्यात आलेल्या निविदा
अजित पवार, देवगिरी १९ लाख ८९ हजार
सुधीर मुनगंटीवार, पर्णकुटी १ कोटी ५० लाख
राधाकृष्ण विखे-पाटील, रॉयलस्टोन १ कोटी ५८ लाख
गुलाबराव पाटील, जेतवन १ कोटी १५ लाख
दीपक केसरकर, रामटेक ७५ लाख ४२ हजार
तानाजी सावंत, लोहगड ८७ लाख ४६ हजार
बाळासाहेब भवन, ब्रह्मगिरी १ कोटी ५७ लाख
अतुल सावे, शिवगड १ कोटी ४ लाख
शंभूराज देसाई, पावनगड ८३ लाख २४ हजार
चंद्रकांत पाटील, सिंहगड ५२ लाख ३७ हजार
राहुल नार्वेकर, शिवगिरी ४२ लाख
विजयकुमार गावित, चित्रकूट १ कोटी ५४ लाख
उदय सामंत, मुक्तगिरी १ कोटी १६ लाख
संदीपान भुमरे, रत्नसिंधू ३७ लाख २६ हजार
दिलीप वळसे पाटील, सुवर्णगड ७३ लाख
अब्दुल सत्तार, पन्हाळगड ५० लाख
अदिती तटकरे, प्रतापगड ३५ लाख ९९ हजार
अग्रदूत, नंदनवन ५० लाख २५ हजार
बी/६ ७२ लाख ७५ हजार
मंत्री बंगले, वार्षिक देखभाल १ कोटी २६ लाख
पाण्याची टाकी बांधकाम १ कोटी ३२ लाख
फर्निचर साहित्य ३३ लाख ५५ हजार
मुख्य सचिव बंगला, अ-१० ६१ लाख ७ हजार ५७ लाखांची स्टेशनरी
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राहत असलेल्या ‘रायगड’ या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी ७५ लाखांच्या निविदा काढल्या आहेत, तर बंगल्यावर स्टेशनरी पुरविण्यासाठी तब्बल ५७ लाखांची निविदा काढली आहे.
३० मार्च २०२३ रोजी ‘तोरणा’ बंगल्याच्या कामाचे ४ कोटी १६ लाखांचे बिल अदा केले आहे. आता पुन्हा २ जानेवारी २०२४ रोजी ४ कोटी ६४ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.