मुंबईतील ३० जंक्शन ठरले ‘मृत्युमार्ग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:09 AM2020-12-30T04:09:26+5:302020-12-30T04:09:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत ३० जीवघेणे जंक्शन असून, गेल्या तीन वर्षांत ५०१ जणांचा बळी गेला, तर १,१७२ ...

30 junctions in Mumbai become 'Death Route' | मुंबईतील ३० जंक्शन ठरले ‘मृत्युमार्ग’

मुंबईतील ३० जंक्शन ठरले ‘मृत्युमार्ग’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत ३० जीवघेणे जंक्शन असून, गेल्या तीन वर्षांत ५०१ जणांचा बळी गेला, तर १,१७२ जण गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील ३० सर्वात जीवघेण्या जंक्शन आणि रस्त्यांचा आता अधिकाऱ्यांकडून सविस्तर अभ्यास केला जात आहे आणि या ठिकाणी प्रवास सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुंबई महानगरपालिका, वाहतूक पोलीस आणि ब्लूमबर्ग, तसेच वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय) या संस्थांनी जंक्शन आणि रस्त्यांच्या पायाभूत सुविधा बदलण्यासाठी आणि रचना बद्दलण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ब्लूमबर्ग आणि वाहतूक पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, २०१७ ते २०१९ या कालावधीत ३० ते ५९ वयोगटांतील पादचाऱ्यांना सर्वाधिक अपघात झाले आणि त्यापाठोपाठ मोटारसायकलस्वार होते. २०१९ मध्ये या ३० जंक्शनवर झालेल्या अपघातांमुळे एकूण मृत्युंपैकी ९० टक्के मृत्यू आणि ८३ टक्के जखमी झाले होते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वाहतूक पोलिसांनी जानेवारी-ऑगस्ट, २०२० साठी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडल्याचा अहवालही प्रसिद्ध केला. या काळात शहरात १७२ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी ४७ टक्के लोक पादचारी होते. या आकडेवारीनुसार १८४ किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेल्या १५ जंक्शन आणि १५ रस्त्यांपैकी सर्वाधिक (२१०) मृत्यू झोन ४ मधील रस्ते आणि जंक्शनवर झाले आहेत. यामध्ये सायन, माटुंगा, वडाळा टीटी, ॲन्टॉप हिल, भोईवाडा आणि काळाचौकी या भागांचा समावेश आहे. झोन १० मध्ये म्हणजे वांद्रे पूर्वेतील खेरवाडी ते अंधेरी पूर्व, बहुतेक वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर २०१९ मध्ये १८ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. या दोन भागांत झालेल्या अपघातांमध्ये १८३ मोटारसायकलस्वार आणि ४५ चारचाकी चालक आणि प्रवाशांचा मृत्यू झाला.

गेल्या काही वर्षांत आम्ही घेतलेल्या प्रयत्नांमुळे २०१५च्या तुलनेत २०१९ मध्ये अपघात आणि मृत्यूंमध्ये २७ टक्क्यांनी घट झाली आहे. रस्ते अपघातांच्या पद्धतीचा अभ्यास करून आणि त्यांना आळा घालण्याचे मार्ग सुचवून जीवितहानी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

- यशस्वी यादव, सहपोलीस आयुक्त (वाहतूक)

Web Title: 30 junctions in Mumbai become 'Death Route'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.