३० टक्के मुंबईकरांची दुबईत गुंतवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 02:46 AM2018-03-14T02:46:54+5:302018-03-14T02:46:54+5:30
गेल्या ५ वर्षांत भारतीयांनी दुबईमध्ये ८३.६५ अब्ज एईडी अर्थात, १ हजार ४८० अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे.
मुंबई : गेल्या ५ वर्षांत भारतीयांनी दुबईमध्ये ८३.६५ अब्ज एईडी अर्थात, १ हजार ४८० अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आहे. दुबईतील रिअल इस्टेट क्षेत्रात २०१७मध्ये केलेल्या आघाडीच्या गुंतवणूकदारांमध्ये भारत दुसºया क्रमांकावर आहे. यातील ३० टक्के गुंतवणूकदार मूळ मुंबईकर आहेत.
मात्र, दुबईमध्ये इच्छापत्राची नोंदणी केली नसेल, तर मालमत्तेची वाटणी शरियतमधील नियम लावून केली जाते. या नियमापासून अनेक गुंतवणूकदार अनभिज्ञ असल्याने, त्यांना दुबईतील अर्थकारणामध्ये तार्किक आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचा दावा एका खासगी कंपनीने केला आहे.
कंपनीचे दक्षिण आशिया व मध्य पूर्वचे चिफ आॅपरेटिंग आॅफिसर विनय मल्होत्रा यांनी सांगितले की, भारतातील आमच्या नेटवर्कद्वारे, कोणत्याही शहरात सुरक्षेची खातरजमा मोफत करता येईल. दुबईत न राहणाºया गुंतवणूकदारांना आमच्या ‘व्हर्च्युअल रजिस्ट्री’मुळे दुबई व रास अल खैमाह येथील मालमत्तेसाठी इच्छापत्र तयार करणे, नोंदविणे, साक्षीदार मिळविणे शक्य आहे. ही स्मार्ट सरकारी सेवा आहे.