साहित्य मंडळासाठी ३० कलमी योजना

By admin | Published: March 30, 2016 12:48 AM2016-03-30T00:48:06+5:302016-03-30T00:48:06+5:30

‘गेली ५५ वर्षे अस्तित्वात असूनही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची ओळख ही केवळ भपकेबाज अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे,’

A 30-point scheme for Literature | साहित्य मंडळासाठी ३० कलमी योजना

साहित्य मंडळासाठी ३० कलमी योजना

Next

मुंबई : ‘गेली ५५ वर्षे अस्तित्वात असूनही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची ओळख ही केवळ भपकेबाज अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे,’ असे मत महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर जोशी यांनी महाराष्ट्रातील २२५ मान्यवरांना एकत्रित आणून, महामंडळाला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात महामंडळाच्या घटनेतील नमूद उद्देश व कार्याकडे वळवण्याची गरज व्यक्त करत, ३० कलमी योजना सुचविण्यात आली.
मुख्य म्हणजे, साहित्य संमेलन हे दरवर्षी भरलेच पाहिजे, असे कोणतेही घटनात्मक बंधन महामंडळावर नाही. त्यामुळे या कृतियोजनेनुसार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दरवर्षी न भरवता, दर दोन वर्षांनी भरवावे, अशी प्रमुख सूचना केली आहे, तसेच संमेलन भरविताना त्या-त्या वर्षीच्या किमान खर्चाचा अंदाज घेऊन बडेजाव टाळून संमेलन
व्हावे, आर्थिक खर्चाची मर्यादा घालावी, असेही सुचविण्यात आले आहे.
संमेलनाक्षपदी निवडली जाणारी व्यक्ती ही निवडणुकीतून न येता नेमणुकीतून यावी, या सतत व्यक्त होणाऱ्या साहित्यिकांच्या भावनेचा आदर करून त्यासाठी अध्यक्ष पद एक तर विभागश: फिरते राखणे किंवा घटक संस्थांनी प्रत्येकी तीन नावे सुचवून त्यातून एकास अध्यक्ष पदी
निवडणे अशा पर्यायावर चर्चा करून आवश्यक घटनादुरुस्तीही सुचविली आहे. याप्रमाणे, महामंडळाच्या आजवरच्या कार्याचा इतिहास प्रकाशित करणे, आजवर केलेल्या ठरावांचे संकलन करून त्यांचा पाठपुरावा करणारी यंत्रणा
उपलब्ध करणे, अशा निरनिराळ््या सूचनांचा समावेश कृतियोजनेत
आहे. (प्रतिनिधी)

कृतियोजनेद्वारे दिशा दिग्दर्शनच
साहित्य महामंडळाच्या स्थापनेपासून गेल्या सुमारे ५५ वर्षांतला, हा अशा प्रकारचा गांभीर्याने केला गेलेला पहिलाच सर्वसमावेशक सकारात्मक प्रयत्न आहे. आपल्या मूळ उद्दिष्ट व कार्यापासून पूर्णपणे भरकटलेल्या या साहित्य महामंडळाने नेमकेपणाने काय काय करायला हवे, याचे सविस्तर दिशा दिग्दर्शनच या कृतियोजनेत करण्यात आले आहे.
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी

Web Title: A 30-point scheme for Literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.