- महेश चेमटे मुंबई : एसटी महामंडळाच्या ‘एसटीचे तिकीट दाखवा ३० रुपयांत चहा नाष्टा मिळवा’ या योजनेला महामार्गावरील हॉटेल मालकांनी धाब्यावर बसविले आहे. ३० रुपयांत फक्त अर्धा कप चहा आणि नावापुरताच नाश्ता मिळत असल्याचा आरोप एसटीच्या प्रवाशांनी केला आहे.एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष योजना सुरू केली होती. त्या अंतर्गत एसटी महामंडळ आणि संबंधित हॉटेल मालक यांच्यात करार करण्यात आला. त्यानुसार, एसटीच्या प्रवाशांना तिकीट दाखविल्यास हॉटेल मालकांनी ३० रुपयांत चहा व नाश्ता द्यावा, असे ठरले होते. मात्र, ही योजना धाब्यावर बसविण्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. हॉटेल मालकांवर महामंडळाची जरब नसल्यामुळे पैसे देऊनही मनस्ताप सहन करावा लागत असल्याची प्रवाशांची ओरड आहे.याबाबत सचिन जगदाळे या प्रवाशाने सांगितले की, ‘ठाण्याहून चिंचवडला जात असताना, आमची एसटी बस लोणावळ्याच्या ‘एनएच ४’ फूड मॉलला थांबली. एसटीचा हा अधिकृत थांबा असल्याने, मी तिकीट दाखवून ३० रुपयांत पोहे आणि चहा घेतला. या योजनेंतर्गत येणारे बाकी पदार्थ बघूनच घ्यावेसे वाटले नाहीत. कहर म्हणजे पोहे मला पाणीपुरी देतात, त्या बारक्या चंदेरी वाटीत देण्यात आले होते. पैसे देऊन एसटी प्रवाशांच्या होणाऱ्या या थट्टेला कोण आवर घालणार,’ असा प्रश्न जगदाळे यांनी उपस्थित केला आहे. स्वारगेट-ठाणे मार्गावरील एसटी बस लोणावळ्याच्या हॉटेल सेंटर पॉइंटवरदेखील अशाच प्रकारचा अनुभव आल्याचेही जगदाळे यांनी सांगितले. तसेच याकडे एसटी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.>यालाच‘उपमा’ म्हणतात!मुंबईतील संजय पाटील यांनी सांगितले की, जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून एसटीने प्रवास करत असताना, येथील एसटीची योजना उपलब्ध असलेल्या हॉटेलमध्ये मी उपमा मागवला. तो गरम पाण्यातून काढलेला रवा व हिरव्या मिरच्यांचा पाणीदार लगदा होता. याबाबत तक्रार केली असता, कॅश काउंटरवरील मुलीने, ‘असाच मिळतो आमच्याकडे, यालाच उपमा म्हणतात,’ असे सांगितले. शिवाय त्याच्याऐवजी शिरा घेण्यास सुचविले. त्या शिºयाचीही अवस्था उपम्यासारखीच होती. पाण्याची बाटली बाकी ठिकाणी २० रुपयांना मिळत असली, तरी येथे २५ रुपये, बाहेर १२ रुपयांना मिळणारा वडापाव येथे २५ रुपयांना मिळतो. शिवाय दर्जाबाबत बोलायलाच नको. हॉटेल मालकांच्या अरेरावीवर नक्की जरब बसणार तरी कधी, असा सवाल पाटील यांनी केला.>असा आहे महामंडळाचा आदेशप्रत्येक हॉटेलच्या ठिकाणी ३० रुपयांत चहा व नाश्ता (२ बटाटेवडे, २ मेदूवडा, पोहे-उपमा-शिरा यांपैकी एक आणि चहा) देण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. त्याचबरोबर, एसटी प्रवाशांसाठी ‘येथे ३० रुपयांत चहा व नाष्टा मिळेल’ असे फलक दर्शनी भागात लावावेत. संबंधित बाबींचा उल्लेख करार करताना स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे; पण हे आदेश अनेक हॉटेल चालकांनी धाब्यावर बसविल्याचे चित्र आहे.>योजनेंतर्गत महामार्गावरील एसटीचे अधिकृत थांबेविभाग मार्ग हॉटेलचे नावठाणे मुंबई-नाशिक हॉटेल जयदुर्गाकल्याण-नगर अपना ढाबानाशिक-मुंबई ग्रीन व्ह्यूमुंबई पुणे-मुंबई-पुणे एनएच४ यशराज, सेंटर पॉइंटमुंबई-पुणे नीता इंटरनॅशनलपुणे पुणे-सोलापूर बाश्रीसोलापूर-पुणे देवा फूड कोर्टअहमदनगर-पुणे कावेरीनाशिक-पुणे हेमंत गार्डनपुणे-पंढरपूर शिवनेरीपुणे-मुळशी शिवसागरपुणे-नाशिक इंद्रप्रस्थपुणे-नाशिक फाउंटन फूड अॅण्ड फनऔरंगाबाद औरंगाबाद-जळगाव भारत दर्शन वस्तुसंग्रहालयजालना जालना-मंठा यशवंतीधुळे-नाशिक दत्त टीनाशिक-औरंगाबाद राधिका गार्डन, आदित्य फूड हब, अन्नपूर्णानाशिक-नंदुरबार-नाशिक शाहू रस्साबीड औरंगाबाद-बीड-सोलापूर नैवेद्यम्सातारा कोल्हापूर-पुणे न्यू राही, रुची गार्डनपुणे-कोल्हापूर साई सेवा, आकाशअहमदनगर औरंगाबाद-नगर धनश्रीदौंड-नगर अमोलनाशिक-पुणे मिचौमॅटिकनगर-पुणे स्माइलस्टोनऔरंगाबाद-नगर लिलियम पार्कबुलडाणा मुंबई-नागपूर श्री परिवारउस्मानाबाद उमरगा-हैदराबाद राजपंजाबी ढाबा
३० रुपयांत अर्धा कप चहा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 5:54 AM