३० हजारांत बांगलादेशातील मुलीचा सौदा

By admin | Published: February 20, 2017 04:23 AM2017-02-20T04:23:39+5:302017-02-20T04:23:39+5:30

गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासत शिक्षकानेच अत्याचार केल्याने नाइलाजाने शाळा सोडून घरकाम करण्याची वेळ आली. परंतु

30 thousand women in Bangladesh deal | ३० हजारांत बांगलादेशातील मुलीचा सौदा

३० हजारांत बांगलादेशातील मुलीचा सौदा

Next

मनीषा म्हात्रे / मुंबई
गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासत शिक्षकानेच अत्याचार केल्याने नाइलाजाने शाळा सोडून घरकाम करण्याची वेळ आली. परंतु दुर्दैवाने घरमालकाच्याही विकृत वासनेला ती बळी पडली. या अत्याचारामुळे तिच्या कुटुंबीयांनीही धुडकारले. त्यानंतर मुंबईत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेने तिला वेश्याव्यवसायासाठी मुंबईत आणले. परंतु देवासारखे धावून आलेल्या कर्तव्यदक्ष पोलिसांनी तिची या नरकयातनेतून सुटका केली आहे. ही आहे अवघ्या १४ वर्षांच्या मुलीची दुर्दैवी कहाणी...
मूळची पश्चिम बंगालची रहिवासी असलेली पायल (नाव बदलले आहे). शालेय शिक्षण घेत असताना गुरुवर्य असलेल्या नराधम शिक्षकाने शाळेतच पायलवर लैंगिक अत्याचार केले. शिक्षकाच्या रोजच्या अत्याचारांमुळे तिने शाळा सोडली. आईसोबत परिसरात घरकामाला जाऊन कुटुंबाला हातभार लावू लागली. शिक्षकाच्या अत्याचारातून सुटून वर्ष उलटत नाही, तोच घरमालकानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर मात्र ती पूर्णत: कोलमडली.
कुटुंबाने नाकारलेल्या पायलच्या अशा अवस्थेची माहिती मिळताच एका महिलेने तिला मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे स्वप्न दाखवले. मुंबईत नोकरीला ठेवण्याऐवजी आपली वेश्याव्यवसायासाठी विक्री झाल्याचे समजताच पायलला धक्का बसला. परराज्यातून आणलेल्या अल्पवयीन मुलीच्या विक्रीसाठी एक टोळी कामाठीपुरा येथे येणार असल्याची माहिती नागपाडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार परिमंडळ ३चे पोलीस उपायुक्त प्रवीण पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बसवत, सहायक पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या पथकाने सापळा रचला. पोलिसांनी पायलची सुखरूप सुटका करत चौकडीला बेड्या ठोकल्या. वेश्याव्यवसायासाठी विक्री करण्याच्या गुन्ह्यात आसाद उल शेख (२१), पल्लवी आसाद उल शेख (२०), जितेंद्र कुमार ठाकूर (२५) आणि शोबुज मंडल (३०) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य पसार आरोपींचा शोध सुरू आहे.
शोबुजच्या नावावर तीन मतदान ओळखपत्रे
मुलीच्या विक्रीमध्ये महत्त्वाची भूमिका असणारा शोबुज मंडल हा कामाठीपुरा येथील रहिवासी आहे. त्याच्या घरझडतीमध्ये पोलिसांनी ३ मतदान ओळखपत्रे, २ आधार कार्डसह अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रे आढळून आली आहेत. तोही मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. असे असतानाही त्याच्याकडे ही कागदपत्रे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नागपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 30 thousand women in Bangladesh deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.