३०० रुपयांसाठी हत्या !अल्पवयीन आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 05:29 AM2017-10-31T05:29:58+5:302017-10-31T05:30:21+5:30

गोवंडी ते मानखुर्द रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या हत्येचा गुंता वाशी रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोडवला आहे. केवळ ३०० रुपयांच्या वादाचे रुपांतर बाचाबाचीत होऊन आरोपीने इम्रान इब्राहिम कुरेशी (१९) याच्या शरीरावर वार केले.

300 rupees for murder: Minor accused held by Railway police | ३०० रुपयांसाठी हत्या !अल्पवयीन आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

३०० रुपयांसाठी हत्या !अल्पवयीन आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Next

मुंबई: गोवंडी ते मानखुर्द रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या हत्येचा गुंता वाशी रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोडवला आहे. केवळ ३०० रुपयांच्या वादाचे रुपांतर बाचाबाचीत होऊन आरोपीने इम्रान इब्राहिम कुरेशी (१९) याच्या शरीरावर वार केले. हा खून अपघात भासवण्यासाठी रेल्वे रुळावर मृतदेह नेल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी अल्पवयीन असून तो १७ वर्षांचा आहे. २७ आॅक्टोबर रोजी रात्री उशीरा सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
गोवंडी परिसरात राहणारे आरोपी आणि मृत इम्रान हे दोघे मित्र होते. हे दोघे देवनारच्या कत्तलखान्यात कामाला होते. ईदच्या दिवशी आरोपीने इम्रानकडून ३०० रुपयांचे मांस विकत घेऊन पैसे नंतर देतो असे सांगितले. यानंतर वारंवार त्याने पैसे देण्यासाठी तगादा लावला होता. ९ आॅक्टोबर रोजी रात्री आरोपीने इम्रानला रेल्वे ट्रॅकवर भेटायला बोलावले. इम्रानने पैशांची मागणी केली आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रुपांतर भांडणात झाले. रागातून त्याच्या गळ््यावर आणि शरीरावर वार केले. तो मरण पावल्याची खात्री झाल्यावर त्याचा मृतदेह रेल्वेरुळावर टाकला, अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली. आरोपीकडून हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे.
वाशी स्थानकातील पंचनामा आणि शवविच्छेदन अहवालाची तुलना केल्यामुळे हा अपघात नसून खून असल्याची शक्यता गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी वर्तवली. त्यानूसार पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Web Title: 300 rupees for murder: Minor accused held by Railway police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा