‘थर्टीफर्स्ट’साठी ३० हजार पोलिसांचा फौजफाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 05:28 AM2017-12-29T05:28:46+5:302017-12-29T05:28:55+5:30

मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असताना कसल्याही विघ्नाविना तो उत्साहात पार पाडावा, यासाठी शहर व उपनगरातील प्रमुख ठिकाणी तब्बल ३० हजारांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार आहे.

30,000 police force for ThirtyFirst | ‘थर्टीफर्स्ट’साठी ३० हजार पोलिसांचा फौजफाटा

‘थर्टीफर्स्ट’साठी ३० हजार पोलिसांचा फौजफाटा

Next

मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असताना कसल्याही विघ्नाविना तो उत्साहात पार पाडावा, यासाठी शहर व उपनगरातील प्रमुख ठिकाणी तब्बल ३० हजारांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार आहे. तसेच महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी विशेष पथके बनविण्यात आली असून हुल्लडबाजांवर त्यांची करडी नजर असणार आहे.
यंदा ३१ डिसेंबर हा ‘वीकएन्ड’ला असल्याने शुक्रवारपासून मुंबईकर सुट्टीच्या मूडमध्ये असणार आहेत. त्यामुळे आजपासून शहरातील प्रमुख मार्गांवर विशेष नाकाबंदी लागू करून वाहनांची झडती घेतली जात आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अतिरेकी हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणेकडून कसलाही इशारा मिळालेला नाही. मात्र काटेकोर सुरक्षा यंत्रणा राबविली जात असल्याचे पोलीस आयुक्तांचे प्रवक्ते उपायुक्त दीपक देवराज यांनी स्पष्ट केले.
गेट वे आॅफ इंडिया, मरिन लाइन्स, तसेच गिरगाव, गोराई, जुहू चौपाटीसह सर्व समुद्रकिनारे, उद्याने, रेल्वे स्टेशन व प्रमुख हॉटेलच्या परिसरात विशेष बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. त्यासाठी विशेष प्रतिसाद पथक (क्यूआरटी), राज्य राखीव दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले आहे. महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पथक बनविण्यात आलेले आहे. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. यासह ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ आणि अमली पदार्थविरोधी मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जाणार आहे. ३१ डिसेंबरनिमित्त पहाटे पाचपर्यंत सर्व हॉटेल, बार व पब उघडे ठेवण्याची अनुमती सरकारने दिली आहे. तरीही या ठिकाणी कसलेही गैरकृत्य, तरुणीच्या छेडछाडीची घटना होऊ नये, यासाठी विशेष देखरेख ठेवली जात आहे.
तसेच हॉटेल व सार्वजनिक ठिकाणी होणाºया पार्टी, गर्दीच्या ठिकाणच्या घटनांचे पोलिसांकडून मोबाइलवर रेकॉर्डिंग केले जाणार आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असले तरी खबरदारी म्हणून त्याचे चित्रण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
>‘बेस्ट’च्या जादा बस
बेस्ट उपक्रमामार्फत नववर्ष स्वागतासाठी मुंबईतील चौपाट्यांवर जाणाºया मुंबईकरांच्या सोयीसाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी बसमार्ग क्रमांक ७ मर्या., १११, ११२, २०३, २३१, २४७ आणि २९४ वर रात्री १०.०० वाजल्यापासून एकूण २० एकमजली जादा बस सोडण्यात येणार आहेत. तसेच मदतीसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू चौपाटी, गोराई बीच तसेच चर्चगेट स्थानक (पूर्व) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इत्यादी ठिकाणी वाहतूक अधिकारी, बस निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

Web Title: 30,000 police force for ThirtyFirst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस