नियमित विद्यार्थ्यांसह शिक्षण मध्येच सोडलेल्यांसाठी कौशल्य विकास मंडळाचे ३०१ अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:05 AM2021-07-28T04:05:44+5:302021-07-28T04:05:44+5:30

मंडळाचे नवीन संकेतस्थळ व बोधचिन्हाचे अनावरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाच्या विविध ३०१ अंशकालीन ...

301 courses of Skill Development Board for those who have dropped out of education along with regular students | नियमित विद्यार्थ्यांसह शिक्षण मध्येच सोडलेल्यांसाठी कौशल्य विकास मंडळाचे ३०१ अभ्यासक्रम

नियमित विद्यार्थ्यांसह शिक्षण मध्येच सोडलेल्यांसाठी कौशल्य विकास मंडळाचे ३०१ अभ्यासक्रम

Next

मंडळाचे नवीन संकेतस्थळ व बोधचिन्हाचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाच्या विविध ३०१ अंशकालीन व पूर्णवेळ अभ्यासक्रमांची माहिती आता नवीन संकेतस्थळावर मिळणार आहे. www.msbsd.edu.in या नव्या संकेतस्थळाचे तसेच मंडळाच्या बोधचिन्हाचे नुकतेच राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते मंगळवारी अनावरण करण्यात आले.

यावेळी ते म्हणाले की, ‘मंडळाच्या नावात बदल झाल्यामुळे नवीन अद्ययावत वेबसाइट बनविण्यात आली आहे. व्यवसाय शिक्षण या संकल्पनेतून स्थापन झालेल्या या मंडळामार्फत रोजगार व स्वयंरोजगारासाठी व्यवसायाभिमुख प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविण्यात येतात. औद्योगिकीकरणातील वाढ, बदलते तंत्रज्ञान, सामाजिक व आर्थिक बदल इत्यादींमुळे मंडळाच्या अभ्यासक्रमात कालानुरुप सुधारणा तसेच वाढ करुन सद्यस्थितीत मंडळामार्फत २८ गटातील ६ महिने, १ वर्ष व २ वर्ष कालावधीचे अंशकालीन व पूर्णवेळ स्वरुपाचे ३०१ अभ्यासक्रम चालविण्यात येत आहेत. नियमित विद्यार्थ्यांसह शिक्षण मध्येच सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विशिष्ट शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळामार्फत कमी कालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम चालविण्यात येतात.

जिल्हा, तालुकास्तरावर तसेच ग्रामीण भागात मंडळाने मान्यता दिलेल्या १ हजार २६९ संस्थांमध्ये ते राबविण्यात येत आहेत. विशेषत: खेड्यापाड्यातील, गोरगरीब विद्यार्थी मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करतात. मंडळाचे अभ्यासक्रम हे रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्याच्या दृष्टीने विशेष करुन शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरतात. या सर्व अभ्यासक्रमांची माहिती आता नव्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Web Title: 301 courses of Skill Development Board for those who have dropped out of education along with regular students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.