३०४ कोटींचा घातला गंडा
By admin | Published: December 26, 2015 02:01 AM2015-12-26T02:01:52+5:302015-12-26T02:01:52+5:30
आर्थिक व्यवहारांची खोटी माहिती आणि कागदपत्रे सादर करून तीन हिरे कंपन्यांच्या संचालकांनी इंडसइंड बँकेला ३०४ कोटींचा गंडा घातल्याची घटना शुक्रवारी समोर आली. या प्रकरणी तिन्ही
मुंबई : आर्थिक व्यवहारांची खोटी माहिती आणि कागदपत्रे सादर करून तीन हिरे कंपन्यांच्या संचालकांनी इंडसइंड बँकेला ३०४ कोटींचा गंडा घातल्याची घटना शुक्रवारी समोर आली. या प्रकरणी तिन्ही हिरे कंपन्यांच्या संचालकांविरुद्ध डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रॅण्ट रोड येथील आॅपेरा हाउसमध्ये इंडसइंड बँकेची शाखा आहे. या शाखेमध्ये मे. योगेश्वर डायमंड प्रा.लि., मे. चारभुजा डायमंड प्रा.लि. आणि मे. कणिका जेम्स प्रा.लि. या हिरे व्यापारी कंपन्यांची खाती आहेत. या बँक खात्यांच्या आधारे कंपन्यांनी विदेशातून हिरे आयात केल्यानंतर आर्थिक व्यवहारांच्या खोट्या बिलांच्या नोंदणी आणि खोटी कागदपत्रे सादर करून बँकेची फसवणूक करण्यास सुरुवात केली होती. बँकेच्या अधिकाऱ्यांना केलेल्या अंतर्गत चौकशीमध्ये इंडसइंड बँकेच्या आॅपेरा हाउस व फोर्ट येथील शाखांमधून मे २०१३ ते जानेवारी २०१४ या कालावधीत तिन्ही कंपन्यांच्या खात्यातून ३०४ कोटी ३५ लाख ७७ हजार ६०९ रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले. (प्रतिनिधी)
डी.बी. मार्ग पोलिसांची कारवाई
या फसवणुकीबाबत बँकेच्या अधिकाऱ्याने गुरुवारी सायंकाळी डी.बी. मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून या तिन्ही हिरे कंपन्यांसह त्यांचे संचालक अनिलकुमार मुलचंद तोपनीवाला, सुनीलकुमार चोखरा आणि अनिल चोखरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती डी.बी. मार्ग पोलिसांनी दिली.