ओएनजीसी बार्ज दुर्घटनेतील ३१ मृतदेहांची ओळख पटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:04 AM2021-05-23T04:04:58+5:302021-05-23T04:04:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे घडलेल्या ओएनजीसीच्या बार्ज पी - ३०५ दुर्घटनेत आतापर्यंत ६१ मृतदेह पोलिसांच्या ताब्यात ...

31 bodies identified in ONGC barge accident | ओएनजीसी बार्ज दुर्घटनेतील ३१ मृतदेहांची ओळख पटली

ओएनजीसी बार्ज दुर्घटनेतील ३१ मृतदेहांची ओळख पटली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे घडलेल्या ओएनजीसीच्या बार्ज पी - ३०५ दुर्घटनेत आतापर्यंत ६१ मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. त्यापैकी ३१ मृतदेहांची ओळख पटली असून, २८ मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. अन्य मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, सर्वांचे डीएनए नमुनेही घेण्यात येत असल्याचे पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी सांगितले.

बार्जवरील मुख्य अभियंता रेहमान शेख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवारी या दुर्घटनेप्रकरणी कॅप्टन राकेश बल्लावसह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ६१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी यलोगेट पोलीस अधिक तपास करत आहेत.

* अशी घडली दुर्घटना

- पी - ३०५ हा एक निवासी बार्ज होता. तेल उत्खनन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय या तराफ्यावर करण्यात आली होती. ११ मे राेजी संध्याकाळीच तोक्ते चक्रीवादळाच्या संकटाचा इशारा हवामान विभागाने दिला हाेता. अरबी समुद्रात या चक्रीवादळाचा धोका असल्याचेही स्पष्ट केले आणि १५ मेपर्यंत समुद्रातल्या बोटींनी किनाऱ्यावर यावे अशी सूचनाही केली हाेती.

- मात्र, हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतरही पी - ३०५ हे बार्ज समुद्रातच होते आणि बॉम्बे हाय तेलक्षेत्राजवळ एका प्लॅटफॉर्मला (ऑईल रिग) बांधून ठेवण्यात आले होते. त्यामुळे पूर्वकल्पना असूनही वेळेत तराफा सुरक्षित ठिकाणी न हलवल्याने साेमवारी १७ मे राेजी ही दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

.................................................

Web Title: 31 bodies identified in ONGC barge accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.