म्हाडाच्या सोडतीसाठी ३१ हजार अर्ज

By admin | Published: November 17, 2016 06:15 AM2016-11-17T06:15:33+5:302016-11-17T06:15:33+5:30

म्हाडाचा घटक असलेल्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर, सातारा येथील विविध योजनांतर्गत सुमारे २ हजार ५०३ सदनिका

31 thousand applications for MHADA draw | म्हाडाच्या सोडतीसाठी ३१ हजार अर्ज

म्हाडाच्या सोडतीसाठी ३१ हजार अर्ज

Next

मुंबई : म्हाडाचा घटक असलेल्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर, सातारा येथील विविध योजनांतर्गत सुमारे २ हजार ५०३ सदनिका आणि ६७ भूखंडांच्या विक्रीसाठी सुमारे ३१ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जाची सोडत २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता स्वारगेटमधील पंडित नेहरू स्टेडियम, गणेश कला क्रीडा रंगमंच येथे काढण्यात येणार आहे.
सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटाकरिता पुणे येथील मोरवाडी, म्हाळुंगे, वानवडी, सोलापूर येथील शिवाजी नगर, जुळे सोलापूर, पुणे येथील दिवे, सासवड येथील सदनिका आणि सातारा येथील वाठार निंबाळकरमधील भूखंडांचा समावेश आहे. प्राप्त अर्जांची प्रारूप यादी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. या संदर्भातील हरकतीवरील अपील आणि सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत होईल. सोडतीसाठीच्या स्वीकृत अर्जांची अंतिम यादी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता प्रसिद्ध केली जाईल. यशस्वी आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. (प्रतिनिधी)

Web Title: 31 thousand applications for MHADA draw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.