राज्यात दिवसभरात काेराेनाचे ३१ हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:05 AM2021-03-30T04:05:27+5:302021-03-30T04:05:27+5:30

राज्यात नव्याने आढळले ३१,६४३ बाधित; १०२ जणांनी गमावला जीव मुंबई : मुंबईत साेमवारी काेराेनाचे ५ हजार ८८८ रुग्ण आढळले ...

31,000 patients of Kareena in the state in a day | राज्यात दिवसभरात काेराेनाचे ३१ हजार रुग्ण

राज्यात दिवसभरात काेराेनाचे ३१ हजार रुग्ण

googlenewsNext

राज्यात नव्याने आढळले ३१,६४३ बाधित; १०२ जणांनी गमावला जीव

मुंबई : मुंबईत साेमवारी काेराेनाचे ५ हजार ८८८ रुग्ण आढळले असून, १२ रुग्णांचा मृत्यू झाला. परिणामी, आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ४० हजार ५६२ झाली असून, बळींचा आकडा ११ हजार ६६१ झाला आहे. सध्या शहर उपनगरात ४७ हजार ४५३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दुसरीकडे राज्यात नव्याने ३१,६४३ काेराेनाबाधित आढळले असून १०२ जणांनी जीव गमावला.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८५ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५३ दिवसांवर आला आहे. २२ ते २८ मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.२७ टक्के असल्याचे दिसून आले. मुंबईत दिवसभरात ३३ हजार ९६६ कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ४० लाख १७ हजार ३१६ चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्स ६४ असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ५७८ आहे. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील २४ हजार ८०८ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.

* राज्यात ३,३६,५८४ रुग्ण उपचाराधीन

राज्यातील काेरोनाबाधितांची एकूण संख्या २७ लाख ४५ हजार ५१८ झाली असून एकूण मृतांचा आकडा ५४ हजार २८३ झाला आहे. सध्या ३,३६,५८४ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात दिवसभरात २०,८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण २३,५३,३०७ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.७१ टक्के झाले आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.९८ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९४,९५,१८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.०८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,०७,४१५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १६,६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

* २०.३२ टक्क्यांनी वाढले रुग्ण

राज्यात मागील २५ दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत २०.३२ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. ४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत रुग्णसंख्या आठ टक्क्यांनी वाढली आहे. या काळात १ लाख १९ हजार ६८ रुग्ण आढळून आले. १ ते २५ मार्चदरम्यान ४ लाख ३९ हजार ३६६ रुग्णनिदान झाले. या संख्येनुसार राज्यात चार पटीने रुग्ण वाढल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.

सक्रिय रुग्ण अधिक असलेले जिल्हे

पुणे ५९,४७५

मुंबई ४६,२४८

ठाणे ३५,२६४

नागपूर ४५,३२२

नाशिक २६,५५३

..............................................

Web Title: 31,000 patients of Kareena in the state in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.