पालिका अधिका-यांचे धाबे दणाणले, 24 तासांत 314 बेकायदा बांधकाम पाडले; सात उपहारगृहांना टाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 08:46 PM2017-12-30T20:46:00+5:302017-12-30T20:50:35+5:30

लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील आगीच्या दुर्घटनेने येथील बेकायदा बांधकामांकडे सर्वांचं लक्ष वेधले आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर आतापर्यंत विभागातील बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत

314 illegal constructions in 24 hours; Avoid seven restaurants | पालिका अधिका-यांचे धाबे दणाणले, 24 तासांत 314 बेकायदा बांधकाम पाडले; सात उपहारगृहांना टाळे

पालिका अधिका-यांचे धाबे दणाणले, 24 तासांत 314 बेकायदा बांधकाम पाडले; सात उपहारगृहांना टाळे

Next

मुंबई - लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील आगीच्या दुर्घटनेने येथील बेकायदा बांधकामांकडे सर्वांचं लक्ष वेधले आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर आतापर्यंत विभागातील बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणा कामाला लागली असून २४ तासांमध्ये मुंबईतील तब्बल ३१४ उपहारगृह, मॉल्स, हॉटेलचे बेकायदा बांधकाम पाडण्यात आले आहे. तसेच सात उपहारगृहांना टाळे लावण्यात आले आहे. अशा प्रकारची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. 

कमला मिल कंपाउंडमधील मोजो बिस्त्रो पब आणि वन अबव्ह रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. या दुर्घटनेत १४ बळी गेल्याने सर्वच स्तरांतून मुंबई महापालिकेला लक्ष्य करण्यात येत आहे. गिरण गावात असे अनेक पब व गच्चीवरील रेस्टॉरंटमध्ये सर्रास बेकायदा बांधकाम सुरु आहेत. या बांधकामांकडे आतापर्यंत पालिका अधिकारी डोळेझाक करीत होते. मात्र या दुर्घटनेनंतर कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून अतिरिक्त आयुक्तांपर्यंत सर्वच आज मैदानात उतरल्याचे दिसून आले. शुक्रवारी संध्याकाळी सुरु केलेल्या या कारवाईतून गेल्या २४ तासांमध्ये मोठमोठ्या रेस्टॉरंट व पबवर धाड टाकण्यात आली आहे. 


मुंबईच्या कानाकोपऱ्यातील तब्ब्ल ६२४ ठिकाणी तापसणी केल्यानंतर तब्ब्ल ३१४ ठिकाणी अनियमितता आढळून आली. यामध्ये जिमखाने, गच्चीवरील रेस्टॉरंट, पब, उपहारगृहांचा समावेश होता. ही सर्व बेकायदा बांधकामं पालिकेने एका दिवसात जमीनदोस्त केली आहेत. त्याचबरोबर माेठ्या प्रमाणात अनियमितता अाढळून आलेल्या सात उपहारगृहांना सील करण्यात आले. तर ४१७ पेक्षा अधिक सिलेंडरदेखील जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत पालिकेच्या तब्बल  एक हजार कामगार- अधिका-यांचा समावेश हाेता. 

कारवाईसाठी विशेष पथक
या कारवाईसाठी सर्व २४ विभागांमध्ये प्रत्येकी तीन चमू तयार करण्यात आल्या आहेत. यात संबंधित खात्यातील कामगार-कर्मचारी-अधिकारी यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त संबंधित सहाय्यक आयुक्त, उपायुक्त व अतिरिक्त आयुक्त घटनास्थळी उपस्थित राहून या कारवाईवर नजर ठेवून आहेत. तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. असे एकूण महापालिकेचे सुमारे एक हजार कामगार-कर्मचारी-अधिकारी आज कार्यरत होते.

पहिलीच अशी कारवाई
गेल्या आठवड्यात साकीनाका येथील फरसाण कारखान्याला लागलेल्या आगीत 12 मजूर मृत्युमुखी पडले हाेते. मात्र कमला मिल येथील आगीच्या दुर्घटनेने यंत्रणा हलली. या घटनेत बळी गेलेले व पब मालक हायप्राेफाईल असल्याने पालिका यंत्रणेवर दबाव वाढला आहे. त्यामुळे पालिकेच्या इतिहासात प्रथमच तिन्ही अतिरिक्त आयुक्त तोडक कारवाई सुरु असलेल्या ठिकाणी स्वत: उपस्थित होते. यामध्ये अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड यांचा समावेश आहे. 

पब, उपहारगृहांना चेतावनी 
 सर्व उपाहरगृहे, हॉटेल्स, मॉल्स यांना आपल्या स्तरावर अग्निसुरक्षेसह सर्व बाबींची तपासणी करावी व नियमांनुसार आवश्यक त्या सुधारणा तातडीने करून घ्याव्यात. अन्यथा, ज्या ठिकाणी नियमबाह्य व बेकायदेशीर बाबी आढळून येतील, त्या तात्काळ तोडण्यात येतील, असा इशारा महापालिका प्रशासनाने आज दिला. 
 

या उपहारगृह, मॉल्स, जिमखाना, पब आदींवर कारवाई...

काळा घोडा जवळील खैबर हॉटेल,

दादाभाई नौरोजी मार्गावरील जाफरान हॉटेल,

मर्जबान मार्गावरील बरिस्ता हॉटेल

कॅथॉलिक जिमखाना,  पारशी जिमखाना मकान लाईन्स

 विल्सन जिमखाना - इस्लाम जिमखाना

ग्रँटराेड पूर्व हॉटेल शालीमार, मौ. शौकत अली मार्ग (हुक्का पार्लर)

 नित्यानंद हॉटेल, राजाराम मोहन रॉय मार्ग

 से चीज हॉटेल, जैन टॉवर, मॅथ्थु रोड (हुक्का पार्लर)

हॉटेल रिव्हायवल, गिरगाव चौपाटी

साहिल हॉटेल

मराठा मंदिर कॉलेजच्या गच्चीवरील अनधिकृत कँटीन व शेड तोडले

डॉमिनो पिझ्झा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग,

 फासोस उपहारगृह, - ऍक्फा उपहारगृह

कैलास लस्सी, दादर

अयप्पा इडली सेंटर

आर्यभवन, - माया स्वीट, - गुरुनानक स्वीट

केरळा हॉटेल

 कमला मिल मधील लेडी बागा, हक से, द फॅटीबो, डीआएच, ग्रँड मा कॅफे, मिल्क, झायको, टप्पा, पीओएच, कोड, प्रवास, स्मॅश

रघुवंशी मिल मधील अनेक अनधिकृत बांधकामे

ऍट्रीया मॉल मधील उपहारगृह इत्यादी

जंक यार्ड, - हिल रेड

 न्यूयॉर्क चॅपल रोड, - केएफसी मॉल

 झेन शॉपिंग सेंटर, - यू टर्न

बॉम्बे अड्डा - रेडियो बार

ओन्ली पराठा, 

अंधेरी-कुर्ला राेड पेनीनसुला हॉटेल, - हॉटेल ऑर्किड इंटरनॅशनल

हॉटेल बावा, कुब, - क्रिस्टल पॉइंट मॉल, प्राव्होग, - टॅप रेस्टॉरंट

हॉटेल आझोन, - पिकासो- एव्हर शाईन मॉल,रिट्रीट हॉटेलचे बेसमेंट तोडले, पेनीनसुला हॉटेल,- हॉटेल चॉईस ली (वीज व पाणीपुरवठा तोडला)- हॉटेल मेग्रुस्सा, गिरीजा हॉटल, - मिडनाईट बार

- सदगुरु हॉटेल, - आदित्य हॉटेल

आरसिटी मॉल, - आर. के. हॉटेल

- जॉली जिमखाना, - नीलकंठ बँक्वेट

जुहू -वुडलेंड टेरेस पब

शिवाजी पार्क जिमखाना 

 

या हॉटेलला टाळे

शिशाज स्काय लाऊंजच्या गच्चीवरील ९ हजार चौरस फूटांचे अधिकृत बांधकाम तोडण्यात येऊन गच्ची सिल करण्यात आली

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड वरील सागर

38 फीस्ट, - मिनी पंजाब- पवई

सॅम्स किचन

चेंबूर फेमिंगाे

साेय हॉटेल

Web Title: 314 illegal constructions in 24 hours; Avoid seven restaurants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.