आयआयटी मुंबईला ३१५ काेटींचे दान, नंदन नीलेकणी यांची संस्थेप्रति कृतज्ञता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 09:35 AM2023-06-21T09:35:09+5:302023-06-21T09:37:09+5:30

आयआयटीने पैसे काेणत्या कार्यासाठी वापरले जातील, याबाबत पत्रकाद्वारे माहिती दिली.

315 crore donation to IIT Mumbai, Nandan Nilekani's gratitude to the institution | आयआयटी मुंबईला ३१५ काेटींचे दान, नंदन नीलेकणी यांची संस्थेप्रति कृतज्ञता

आयआयटी मुंबईला ३१५ काेटींचे दान, नंदन नीलेकणी यांची संस्थेप्रति कृतज्ञता

googlenewsNext

मुंबई/बंगळुरू : इन्फाेसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी आयआयटी मुंबईला ३१५ काेटी रुपये दान केले आहेत. या संस्थेत शिक्षणासाठी ५० वर्षांपूर्वी प्रवेश घेतला हाेता. त्यानिमित्ताने ही रक्कम दान केली आहे. त्यांनी स्वत: याबाबत साेशल मीडियावर माहिती दिली आहे. नीलेकणी यांनी यापूर्वी मुंबई आयआयटीला ८५ काेटी रुपये दान केले.  त्यांनी संस्थेला दान केलेली एकूण रक्कम आता ४०० काेटी रुपये एवढी झाली आहे. एखाद्या संस्थेला माजी विद्यार्थ्याने दान केलेली ही सर्वात माेठी रक्कम आहे. 

आयआयटीने पैसे काेणत्या कार्यासाठी वापरले जातील, याबाबत पत्रकाद्वारे माहिती दिली. जागतिक दर्जाच्या सुविधा देणे तसेच अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात संशाेधनाला प्राेत्साहन देणे, हा या दानामागील प्रमुख हेतू आहे. नीलेकणी यांनी १९७३ मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या पदवीसाठी मुंबई आयआयटीत प्रवेश घेतला हाेता. ही संस्था माझ्या आयुष्याचा आधारस्तंभ असून माझ्या प्रवासाचा पाया संस्थेने रचला. संस्थेने मला जे काही दिले, त्याबाबत एक छाेटेसे याेगदान आहे, असे नीलेकणी म्हणाले. 

नंदन नीलेकणी यांच्या या देणगीच्या योगदानामुळे आयआयटीच्या विद्यार्थ्यांपुढील आणि मानवजातीसमोरील आव्हानांना पेलण्याची क्षमता निर्माण होईल, त्यामुळे विद्यार्थ्यांना मदतच होणार आहे.
- प्रा. सुभासिस चौधरी, आयआयटी मुंबई, संचालक

Web Title: 315 crore donation to IIT Mumbai, Nandan Nilekani's gratitude to the institution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.