मुंबई : तब्बल ३२ कोटींची थकबाकी असतानाही बीकेसीमधील हॉटेल सोफिटेलवर एमएमआरडीएने कोणतीही कारवाई केलेली नसल्याची बाब समोर आली आहे.बांद्रा-कुर्ला कॉप्लेक्समधील श्री नमन हॉटेल्स प्रा. लिमिटेड संचालित सोफिटेल हॉटेलचा अतिरिक्त प्रीमियम थकीत असल्यामुळे त्यास हॉटेल उघडण्याची परवानगी आधी एमएमआरडीएने नाकारलेली होती. नंतर हफ्त्याने रक्कम अदा करण्याचे मान्य करताच एमएमआरडीएने त्यांना परवानगी दिली. पण सोफिटेलने पुढचा हफ्ताच भरला नसल्यामुळे आज मितीस ३१.८२ कोटी रुपये त्यांच्याकडे थकीत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे.या हॉटेलकडे ३१ कोटी ८२ लाख ३१ हजार ९७५ रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. बीकेसी येथील दोन भूखंड श्री नमन हॉटेल्स प्रायवेट लिमिटेडला ४०९.२० कोटीचे मूल्य घेत लीजवर दिले आहेत. ४ वर्षात बांधकाम पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या श्री नमन हॉटेल्स प्रायवेट लिमिटेडला एकूण २१ कोटी ५२ लाख ५० हजार ४११ इतके अतिरिक्त प्रीमियम अदा करणे आवश्यक होते. ११ आॅक्टोबर २०११ रोजी एमएमआरडीए प्रशासनाने भोगवटा प्रमाणपत्र देताना जोपर्यंत अतिरिक्त प्रीमियम अदा केले जात नाही तोपर्यंत हॉटेल सुरु करण्यास मज्जाव केला होता. पण १५ फेब्रुवारी २०१२ रोजी एमएमआरडीए प्रशासनाच्या नगर व क्षेत्र नियोजन विभागाचे प्रमुख संपत कुमार यांनी ५ हप्त्यांची सूट देत हॉटेल पूर्वीच्या पत्रास स्वत: बदल केला. गेल्या ५६ महिन्यात श्री नमन हॉटेल्स प्रायवेट लिमिटेडने फक्त २ हफ्ते अदा करत ८,७६,२८,१०० रुपये एमएमआरडीएच्या तिजोरीत भरले. बाकीचे जवळपास ३२ लाख थकबाकी असतानाही हॉटेल जोरात सुरु आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाता जाता २३ सप्टेंबर २०१४ रोजी आचारसंहिता असताना एमएमआरडीए प्रशासनास आदेश दिले. श्री नमन हॉटेल्स प्रायवेट लिमिटेडतर्फे अतिरिक्त प्रीमियम माफ करण्यासाठी आलेल्यानिवेदनावर चव्हाण यांनी ह्यपरीक्षण करा आणि आवश्यक ते कराह्ण असा शेरा मारत एमएमआरडीए प्रशासनास आदेश जारी केले.एमएमआरडीएला हवी आहे नि:शुल्क सुविधाएमएमआरडीए प्रशासनाने भोगवटा प्रमाणपत्र देताना घातलेल्या अट आणि शर्त पहाता कोणाचेही डोके चक्रावून जाईल अश्या सुविधाची नि:शुल्क मागणी केली आहे. प्रत्येक वर्षी ५० रात्रीसाठी २ सुइट्स नि:शुल्क देण्यात यावी. प्रत्येक वर्षी २० लोकांसाठी कॉन्फरस कक्ष बैठकीसाठी सर्व टेक्निकल उपकरणांसह नि:शुल्क दयावी. तसेच जेवण, पेये आणि अन्य सेवेवर टॅक्स सह होणाºया बिलावर २० टक्के सूट देण्यात यावी.पैसे भरत नसल्यास ताबडतोब भोगवटा प्रमाणपत्र रद्द करत एमएमआरडीए प्रशासनाने सोफिटेल हॉटेल सील करण्याची गरज आहे तसेच एमएमआरडीए प्रशासनातील अधिकाºयांच्या कामाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करण्याची गरज असल्याचे मत अनिल गलगली यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली.बांद्रा-कुर्ला कॉप्लेक्समधील सोफिटेल हॉटेलचा अतिरिक्त प्रीमियम थकीत असल्यामुळे त्यास हॉटेल उघडण्याची परवानगी आधी एमएमआरडीएने नाकारलेली होती.
बीकेसीमधील सोफिटेल हॉटेलवर ३२ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 5:24 AM