विनामास्क नागरिकांकडून ३२ लाखांची दंड वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:08 AM2021-02-23T04:08:31+5:302021-02-23T04:08:31+5:30

रेस्टॉरंट, मंगल कार्यालय, क्लब, जिमखान्यातही धडक कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने विनामास्क फिरणाऱ्या ...

32 lakh fine was recovered from unmasked citizens | विनामास्क नागरिकांकडून ३२ लाखांची दंड वसुली

विनामास्क नागरिकांकडून ३२ लाखांची दंड वसुली

Next

रेस्टॉरंट, मंगल कार्यालय, क्लब, जिमखान्यातही धडक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधातील मोहीम तीव्र केली आहे. शनिवारी दिवसभरात रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृहांतही धडक कारवाई करत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण १६ हजार १५४ विनामास्क नागरिकांकडून प्रत्येकी २०० रुपये, याप्रमाणे ३२ लाख ३० हजार ८०० इतकी दंड वसुली करण्यात आली.

कारवाईदरम्यान महापालिकेच्या २४ विभागांपैकी ‘के/पश्चिम’ विभागात सर्वाधिक म्हणजे २ हजार ३४५ व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करून ४ लाख ६९ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ‘के/पश्चिम’ विभागामध्ये प्रामुख्याने अंधेरी (पश्चिम) परिसराचा समावेश होतो. या खालोखाल ‘एच/पश्चिम’ विभागात १ हजार १५९ जणांकडून २ लाख ३१ हजार ८०० इतका दंड वसूल करण्यात आला. ‘एच/पश्चिम’ विभागामध्ये प्रामुख्याने वांद्रे परिसराचा समावेश होतो.

दक्षिण मुंबईतील ‘ए’ विभागात १ हजार ३० जणांवर कारवाई करून २ लाख ६ हजारांचा दंड वसूल केला. ‘ए’ विभागामध्ये प्रामुख्याने कुलाबा, फोर्ट इत्यादी परिसरांचा समावेश होतो. या खालोखाल एल विभागात ८८६ जणांवर कारवाई करून, १ लाख ७७ हजार २०० एवढा दंड वसूल केला. एल विभागात प्रामुख्याने कुर्ला परिसराचा समावेश होतो.

या खालोखाल एफ/उत्तर विभागामध्ये ७४४ व्यक्तींकडून रुपये १ लाख ४८ हजार ८००, ‘एस’ विभागात ७४३ व्यक्तींकडून १ लाख ४८ हजार ६००, ‘जी/उत्तर’ विभागात ७०९ जणांकडून १ लाख ४१ हजार ८००, ‘के/पूर्व’ विभागात ७०७ व्यक्तींकडून १ लाख ४१ हजार ४००, ‘आर/मध्य’ विभागात ७०५ व्यक्तींकडून १ लाख ४१ हजार, ‘पी/उत्तर’ विभागात ७०३ व्यक्तींकडून १ लाख ४० हजार ६००, ‘एच/पूर्व’ विभागात ६३५ व्यक्तींकडून १ लाख २७ हजार, ‘जी/दक्षिण’ विभागात ६३१ व्यक्तींकडून १ लाख २६ हजार २००, ‘आर/उत्तर’ विभागात ६१६ जणांकडून १ लाख २३ हजार २००, ‘एफ/दक्षिण’ विभागात ६०२ जणांकडून १ लाख २० हजार ४००, ‘पी/दक्षिण’ विभागात ६०० व्यक्तींकडून १ लाख २० हजार, ‘एम/पश्चिम’ विभागात ५९७ व्यक्तींकडून १ लाख १९ हजार ४००, ‘एन’ विभागात ५८७ व्यक्तींकडून १ लाख १७ हजार ४००, ‘आर/दक्षिण’ विभागात ५७२ व्यक्तींकडून १ लाख १४ हजार ४००; तर ‘डी’ विभागात ५२१ व्यक्तींकडून १ लाख ४ हजार २०० एवढा दंड वसूल करण्यात आला.

या खालोखाल महापालिकेच्या ‘टी’ विभाग परिसरातून ३५२ व्यक्तींकडून ७० हजार ४००, ‘सी’ विभाग परिसरातून २३७ व्यक्तींकडून ४७ हजार ४००, ‘बी’ विभाग परिसरातून २१३ व्यक्तींकडून ४२ हजार ६००, ‘एम/पूर्व’ विभाग परिसरातून १७८ व्यक्तींकडून ३५ हजार ६००, तर ‘ई’ विभाग परिसरातून ८२ व्यक्तींकडून १६ हजार ४०० रुपये एवढा दंड मास्क न घातल्याने वसूल करण्यात आला.

Web Title: 32 lakh fine was recovered from unmasked citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.