Join us

सुरक्षा रक्षकांकडून ३२ वर्षीय तरुणीला लिफ्टमध्ये मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 7:46 AM

तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या सोसायटीमध्ये आर. के. शर्मा सिक्युरिटीसचे ९ सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. सप्टेंबर २०१९ मध्ये वडील आणि भावासोबत सिक्युरिटी सुपरवायझर सत्या यादवने उद्धटपणे वर्तन केले.

ठळक मुद्दे२८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास कामावरून घरी जाण्यासाठी लिफ्टमधून जात असताना सोसायटीच्या महिला सुरक्षा रक्षकांनी तुम्ही फ्लॅट ३०२ मधीलच आहात का, याबाबत विचारणा केली.

मुंबई : दादरच्या प्रभादेवीतील ओमेगा लग्जेरियन इमारतीच्या लिफ्टमध्ये दोन महिला सुरक्षा रक्षकांकडून ३२ वर्षीय तरुणीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सुरक्षा सुपरवायझरविरोधात केलेल्या तक्रारीच्या रागात ही मारहाण करण्यात आली. या घटनेचे मंगळवारी सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दोघीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या सोसायटीमध्ये आर. के. शर्मा सिक्युरिटीसचे ९ सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. सप्टेंबर २०१९ मध्ये वडील आणि भावासोबत सिक्युरिटी सुपरवायझर सत्या यादवने उद्धटपणे वर्तन केले. त्याचवेळी सोसायटीकडे तक्रार करण्यात आली होती. यातच गेल्यावर्षी मार्चमध्ये काकांच्या उपचारासाठी कामगार ठेवले. यावेळीदेखील यादवने कामगारांना धमकावून येथे येण्यास विरोध केला. तसेच यादव याची बघण्याची, बोलण्याची पद्धत बरोबर नसल्याने वेळोवेळी सोसायटीकडे तक्रार केली. मात्र सोसायटीने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे.

२८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास कामावरून घरी जाण्यासाठी लिफ्टमधून जात असताना सोसायटीच्या महिला सुरक्षा रक्षकांनी तुम्ही फ्लॅट ३०२ मधीलच आहात का, याबाबत विचारणा केली. तरुणीने हो म्हणताच 'यादवविरोधात तक्रार केली का? तसेच पुन्हा तक्रार दिल्यास परिणाम वाईट होतील, असे धमकाविण्यास सुरुवात केली. त्यांनी मोबाइलवरून शूट करण्याचा प्रयत्न करताच त्यांचा मोबाइल हिसकावून मारहाण सुरू केली. केस ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अखेर लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर पोहोचताच कुटुंबीयांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानुसार १० नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क पोलिसांनी रजवंत राजपूत त्रिलोकसिंग व प्रियांका बासूतकर या दोघींविरोधात गुन्हा दाखल केला आला आहे. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी