Join us

दिलासादायक! राज्यात ३२ हजार जणांची कोरोनातून मुक्तता; २५६० नवे रुग्ण सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 9:39 PM

सध्या राज्यात ३९ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. पण कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही चांगलं आहे. राज्यात आज ९९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ३२ हजार ३२९ रुग्णांची कोरोनातून मुक्तता झाली आहे.  दरम्यान, आज कोरोनाच्या २५६० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ३९ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ९७ हजार २७६ नमुन्यांपैकी ७४ हजार ८६० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७१ हजार ९१५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७१ हजार ९१२ खाटा उपलब्ध असून सध्या ३३ हजार ६७४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३६ खासगी अशा एकूण ८२ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. १ मे ते १ जून या कालावधीत राज्यातील रुग्ण वाढीचा वेग क्रमशः कमी होत असून, १ जून रोजी तो देशाच्या सरासरी पेक्षा (४.७४ टक्के) देखील कमी झालेला आहे, हे स्पष्ट झाले. त्याचवेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरून राज्यातील कोरोना प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होते आहे. राज्यात १२२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. 

राज्यातील जिल्हानिहाय रुग्णांचा तपशील  

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (४३,४९२), बरे झालेले रुग्ण- (१७,४७२), मृत्यू- (१४१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), पॉझिटिव्ह रुग्ण- (२४,५९७)

ठाणे: बाधित रुग्ण- (१०,८६५), बरे झालेले रुग्ण- (३९९२), मृत्यू- (२४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (६६३३)

पालघर: बाधित रुग्ण- (११९९), बरे झालेले रुग्ण- (४४७), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (७१८)

रायगड: बाधित रुग्ण- (१२३८), बरे झालेले रुग्ण- (६४५), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), पॉझिटिव्ह रुग्ण- (५४०)

नाशिक: बाधित रुग्ण- (१२३५), बरे झालेले रुग्ण- (९४२), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२२५)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१६५), बरे झालेले रुग्ण- (६२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (९५)

धुळे: बाधित रुग्ण- (१७७), बरे झालेले रुग्ण- (९४), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (६३)

जळगाव: बाधित रुग्ण- (७८१), बरे झालेले रुग्ण- (३३०), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३७७)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३७), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (५)

पुणे: बाधित रुग्ण- (८४६३), बरे झालेले रुग्ण- (४५८५), मृत्यू- (३६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३५११)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१०३२), बरे झालेले रुग्ण- (४४८), मृत्यू- (८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (४९९)

सातारा:  बाधित रुग्ण- (५६४), बरे झालेले रुग्ण- (२०६), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३३६)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६०७), बरे झालेले रुग्ण- (२१३), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३८८)

सांगली: बाधित रुग्ण- (१२६), बरे झालेले रुग्ण- (६३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (५९)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (७०)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (३१४), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (१९१)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१६५३), बरे झालेले रुग्ण- (१०९५), मृत्यू- (८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (४७४)

जालना: बाधित रुग्ण- (१५४), बरे झालेले रुग्ण- (५९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (९३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१९३), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (८७)

परभणी: बाधित रुग्ण- (७३), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (४८)

लातूर: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (५३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (९१), बरे झालेले रुग्ण- (४०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (४९)

बीड: बाधित रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२१)

नांदेड: बाधित रुग्ण- (१३५), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (३०)

अकोला: बाधित रुग्ण- (६४७), बरे झालेले रुग्ण- (३५८), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), पॉझिटिव्ह रुग्ण- (२५५)

अमरावती: बाधित रुग्ण- (२६१), बरे झालेले रुग्ण- (१५८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (९७)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१४८), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (४८)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (७४), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२६)

वाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२)

नागपूर: बाधित रुग्ण- (६३५), बरे झालेले रुग्ण- (३९२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२३२)

वर्धा: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (६)

भंडारा: बाधित रुग्ण- (३७), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२५)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (१८)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२७), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (३९), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (२७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), पॉझिटिव्ह रुग्ण- (४५)

एकूण: बाधित रुग्ण-(७४,८६०), बरे झालेले रुग्ण- (३२,३२९), मृत्यू- (२५८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९), पॉझिटिव्ह रुग्ण-(३९,९३५)

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस