मुंबईत दिवसभरात ३२३ कोरोना रुग्ण; सात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:06 AM2021-07-31T04:06:58+5:302021-07-31T04:06:58+5:30
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी आणखी घट दिसून आली. दिवसभरात ३२३ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन ...
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी आणखी घट दिसून आली. दिवसभरात ३२३ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०५ टक्के एवढा खाली आला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही आता १४३४ दिवसांवर पोहोचला आहे. दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत मुंबईत सात लाख ३४ हजार ४३५ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सात लाख ११ हजार ७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ८८० रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या पाच हजार ८२ सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या सात रुग्णांपैकी पाच रुग्णांना सहव्याधी होत्या. मृतांमध्ये पाच पुरुष, तर दोन महिला रुग्णांचा समावेश होता. यापैकी चार मृत झालेले रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर उर्वरित तीन रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. दिवसभरात ३२ हजार २८५ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ८१ लाख १८ हजार ४३७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.