विंधण विहिरीच्या प्रतीक्षेत ३२५ गावे

By admin | Published: May 26, 2015 10:45 PM2015-05-26T22:45:22+5:302015-05-26T22:45:22+5:30

८० लाख आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी एक कोटी ५० लाख असा एकूण २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी सरकारकडून अद्यापही जिल्हा परिषदेच्या पदरात पडलेला नाही.

325 villages awaiting Vindhuna well | विंधण विहिरीच्या प्रतीक्षेत ३२५ गावे

विंधण विहिरीच्या प्रतीक्षेत ३२५ गावे

Next

आविष्कार देसाई ल्ल अलिबाग
जिल्ह्यातील ३२५ विंधण विहिरींसाठी आवश्यक असणारा ८० लाख आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी एक कोटी ५० लाख असा एकूण २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी सरकारकडून अद्यापही जिल्हा परिषदेच्या पदरात पडलेला नाही. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेला २०१४-१५ या कालावधीत एकही विंधण विहीर खोदता आलेली नाही. परिणामी ३२५ ठिकाणच्या नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरूच राहिली.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या. त्यावर उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेकडे शिल्लक असलेला १४ लाख ७४ हजार रुपयांचा निधी पेण, पनवेल, खालापूर, रोहे, महाड आणि पोलादपूर तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी वापरण्यात आला. याच कालावधीत रायगड जिल्हा परिषदेने जिल्हा प्रशासनाकडे ३२५ विंधण विहिरी खोदण्यासाठी ८० लाखांच्या निधीची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्याचप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी १ कोटी ५० लाखांच्या निधीची मागणी केली होती.
जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या प्रस्तावाला मान्यता देऊन मार्च महिन्यात निधीबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता. मात्र सरकारकडून एक रुपयाही आला नाही. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागानेही यास दुजोरा दिला आहे.
जिल्ह्यातील १०८ गावे आणि २०६ वाड्यांमध्ये एकूण ३२५विंधण विहिरी खोदाईसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. निधी प्राप्तच झाला नसल्याने विंधण विहिरीची खोदाई झाली नसल्याचे समोर आले असून अजूनही जिल्ह्यातील ३२५ गावांतील नागरिक विंंधण विहिरींच्या प्रतीक्षेत आहे. त्या ठिकाणच्या जनतेला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांनी पावसाळा सुरू होईल, त्यामुळे आता निधी उपलब्ध झाला तरी त्याचा खरंच विंधण विहिरींसाठी उपयोग होईल का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

तालुका गावे वाड्या एकूण विंधण विहिरींची संख्या
अलिबाग ९ ५१४१४
पेण०११११ ११
पनवेल७५१२१२
कर्जत१९२७ ४६४६
खालापूर६२४३०३०
रोहे१३१९३२३२
माणगाव१५ २७४२४२
महाड१५४०५५५५
पोलादपूर४२९३३३३
श्रीवर्धन१५१३२८२८
म्हसळा ४ ८१२१२
उरण०१११
सुधागड१८९९
एकूण१०८२०६३२५३२५

Web Title: 325 villages awaiting Vindhuna well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.