Join us

पालिकेचे ३२७ कंत्राटी डॉक्टर मुख्यमंत्र्यांकडे मागणार दाद

By मनोहर कुंभेजकर | Published: June 06, 2023 7:17 PM

पालिकेच्या डॉक्टरांच्या सर्व प्रश्नांची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी काल सायंकाळी  बाळासाहेब भवन येथे डॉ.दीपक सावंत यांनी बैठक आयोजित केली होती.

मुंबई- मुंबई महानगर पालिकेच्या नायर, सायन, केईएम, कूपर आदी रूग्णालयातील ३००हून अधिक डॅाक्टर आज मितीला  पालिकेत गेल्या काही वर्षापासून सर्जरी पासून अँनाटॅामीच्या ३० विविध शाखांतून कार्यरत आहे. गेली अनेक वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले ३२७ कंत्राटी डॉक्टर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. राज्याचे माजी आरोग्य मंत्री व शिंदे गटाचे उपनेते डॉ.दीपक सावंत यांनी लोकमतला ही माहिती दिली.

पालिकेच्या डॉक्टरांच्या सर्व प्रश्नांची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी काल सायंकाळी  बाळासाहेब भवन येथे डॉ.दीपक सावंत यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला नायर रूग्णालयाचे डॅा. सागर आंब्रे व त्यांचे सहकारी डॉक्टर  हजर होते. त्यांनी मुख्यमंत्र्याकडे आपल्या प्रश्नांची उकल करावी व न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली अशी माहिती त्यांनी दिली. 

यापूर्वी ही अनेकदा पालिकेच्या कंत्राटी डॉक्टरांनी वेगवेगळे तत्कालीन मुख्यमंत्री,माजी मंत्र्यां समोर आपल्या व्यथा मांडल्या. पण आमच्या वेतनात फरक झाला नाही. इतर डॅाक्टर प्रमाणे फॅसिलीटी मिळाल्या नाही.आम्ही ७-८ वर्ष सेवा देऊन ही आम्ही आजही कॅान्ट्रॅक्च्युअल आहोत. याबाबत विचारणा केली असता, बिंदूनामावलीचे कारण पुढे केले जाते . ईन्टर व्ह्यूह साठी पदभरती साठी जाहिरात दिली जात नाही , मात्र आज पेशन्ट आम्हीच पाहातो, असि. प्रोफेसर म्हणून ही काम पाहातो.तसेच आम्ही ७-८ वर्ष सेवा देऊन ही आम्ही आजही कॅान्ट्रॅक्च्युअल आहोत याबाबत विचारणा केली असता बिंदूनामावली चे कारण पुढे केले जाते . ईन्टर व्ह्यूह साठी पदभरती साठी जाहिरात दिली जात नाही , मात्र आज पेशन्ट आम्हीच पाहातो असि. प्रोफेसर म्हणून ही काम पाहातो ,असे अनेक मुद्दे डॅा.दीपक सावंत यांच्या समोर मांडले.तर आपण मुख्यमंत्र्यां समोर आपले मांडून त्यांची भेट घडवून आणू  असे डॅा दीपक सावंत यांनी या डॉक्टरांना सांगितले. 

टॅग्स :मुंबईएकनाथ शिंदे