राज्यात कोरोनाच्या ३२८ नवीन रुग्णांचे  निदान; मुंबईत ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 03:25 AM2023-04-11T03:25:48+5:302023-04-11T03:25:56+5:30

कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना सोमवारी  राज्यात ३२८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले.

328 new patients of Corona diagnosed in the state A 51 year old woman died in Mumbai | राज्यात कोरोनाच्या ३२८ नवीन रुग्णांचे  निदान; मुंबईत ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू

राज्यात कोरोनाच्या ३२८ नवीन रुग्णांचे  निदान; मुंबईत ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू

googlenewsNext

मुंबई :

कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना सोमवारी  राज्यात ३२८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले.  त्यात मुंबईतील ५१ वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच २४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे, तर मुंबईतही सोमवारी  ९५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून २८ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ५ रुग्णांना ऑक्सिजन बेड्सवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या मुंबईत १०२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून, सध्या मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या १४५४ इतकी असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

Web Title: 328 new patients of Corona diagnosed in the state A 51 year old woman died in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.