मुंबई : बृहन्मुंबई महापालिका रूग्णालयात उपचारासाठी येतात़ त्यांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था कार्यरत असतात़ या सेवाभावी संस्थांनी पालिका रूग्णालयांना कोट्यवधी रूपयांची मदत केली आहे़ या वर्षी एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान ‘गरीब रुग्ण साहाय्यता निधी’मध्ये दानशूर दाते व संस्थांकडून एकूण ३३ कोटी ३५ लाख ५५ हजार २२६ रुपये एवढी रक्कम दान स्वरूपात प्राप्त झाली आहे. या रकमेतून २५ हजार ११७ एवढ्या गरीब रुग्णांवर आर्थिक मदतीच्या माध्यमातून उपचार करण्यात येऊन त्यांना दिलासा देण्यात आला आहे. परळ येथील के. ई. एम. रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बा. य. ल. नायर रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय, जुहू-विलेपार्ले परिसरातील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय यांचा समावेश आहे. या चारही रुग्णालयांतील ‘गरीब रुग्ण साहाय्यता निधी’मध्ये एकूण ३२ कोटी ६९ लाख ७८ हजार १३६ रुपये एवढी रक्कम दान स्वरूपात प्राप्त झाली आहे. या रकमेतून २१ हजार ४७१ रुग्णांना मदत करण्यात आली आहे, अशी माहिती संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे.पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत ५ विशेष रुग्णालये, २८ प्रसूतिगृहे व १७५ दवाखाने आहेत. ‘गरीब रुग्ण साहाय्यता निधी’मध्ये दानशूर व्यक्ती व संस्थांनी एकूण २८ लाख ३३ हजार ९०९ रुपये एवढी रक्कम दान म्हणून दिली आहे. या रकमेतून १ हजार ९५६ रुग्णांना मदत केली आहे, (प्रतिनिधी)
पालिकेच्या रुग्णालयांना ३३ कोटींची मदत
By admin | Published: March 21, 2017 2:41 AM