गृह खरेदीत ३३ टक्क्यांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:07 AM2021-02-27T04:07:22+5:302021-02-27T04:07:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गतवर्षीच्या तुलनेत नव्या वर्षाच्या पहिल्याच म्हणजे जानेवारी महिन्यात मुंबई महानगर प्रदेशातील गृह खरेदी ३३ ...

33% increase in home purchases | गृह खरेदीत ३३ टक्क्यांची वाढ

गृह खरेदीत ३३ टक्क्यांची वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गतवर्षीच्या तुलनेत नव्या वर्षाच्या पहिल्याच म्हणजे जानेवारी महिन्यात मुंबई महानगर प्रदेशातील गृह खरेदी ३३ टक्क्यांनी वाढली आहे. स्टॅम्प ड्युटीमध्ये मिळालेल्या सवलतीनंतर मुंबई महानगर प्रदेशातील घरांच्या खरेदी-विक्रीत वाढ झाल्याचा दावा क्रेडाई-एमसीएचआयच्या अहवालात करण्यात आला आहे.

कोरोना काळातही गृह खरेदीला संमिश्र प्रतिसाद लाभल्याचा दावा अहवालात करण्यात आला असून, सीबीडी मुंबई, मध्य मुंबई, मध्य उपनगर, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर येथील गृह खरेदी विक्रीचा आढावा यात घेण्यात आला आहे. राज्य सरकारने स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत दिली आणि त्याचा सकारात्मक परिणाम गृह क्षेत्रावर झाला असून, यातून सरकारलाही उत्पन्न मिळाले आहे. स्टॅम्प ड्युटी कमी झाल्याने घर घेणाऱ्यांची संख्या वाढली असून, जानेवारी महिन्यात हा आकडा ३३ टक्क्यांनी वाढला.

क्रेडाईचे एमसीआयचे अध्यक्ष दीपक गोराडिया यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत केवळ एमएमआरमध्येच नव्हे, तर संपूर्ण राज्यात स्थावर मालमत्ता क्षेत्राची पायाभरणी झाली. मुख्यत्वे राज्य सरकारने घेतलेल्या पुरोगामी व निर्णायक उपायांमुळे गृह क्षेत्रास फायदा झाला. जानेवारीत गृहनिर्माण विक्रीत वाढ झाली.

- मुंबई महानगर प्रदेशातील घरे व किमती

सप्टेंबर २० ते जानेवारी २१ : १ लाख ३८ हजार ७२८ घरांची नोंदणी आणि घरांचे मूल्य ९६ हजार ९५६ कोटी

जानेवारी : २२ हजार ७६२ घरांची नोंदणी आणि घरांचे मूल्य १४ हजार १२० कोटी

----------

सप्टेंबर २० ते जानेवारी २१ (घरांच्या नाेंदणीचे एकूण मूल्य)

सीबीडी मुंबई : ५ हजार ५४३ कोटी

मध्य मुंबई : १२ हजार ०५० कोटी

मध्य उपनगर : ५ हजार ३१६ कोटी

पश्चिम उपनगर : २३ हजार ९१२ कोटी

पूर्व उपनगर : १३ हजार ५६५ कोटी

ठाणे : २४ हजार १६३ कोटी

रायगड : ७ हजार ८३६ कोटी

पालघर : ४ हजार ५७१ कोटी

----------------

Web Title: 33% increase in home purchases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.