Join us

३३ लाख कुटुंबांना शिधापत्रिका, ४० लाख गॅस कनेक्शन मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 5:17 AM

दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियान १४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून, या एक महिन्यात ३३ लाख कुटुंबांना शिधापत्रिका आणि ४० लाख गॅस कनेक्शन मिळतील.

मुंबई : दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियान १४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून, या एक महिन्यात ३३ लाख कुटुंबांना शिधापत्रिका आणि ४० लाख गॅस कनेक्शन मिळतील. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा शासनाचा हा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे सांगितले.सह्याद्री अतिथीगृह येथे सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेचा शुभारंभ झाला. या वेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत ,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आ. मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.पात्र कुटुंबांना १०० टक्के शिधापत्रिका वाटप, १०० टक्के धान्य वाटप आणि राज्य धूरमुक्त करण्यास सर्वांना १०० टक्के गॅस कनेक्शन अशी या अभियानाची तीन उद्दिष्टे असतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.