Join us

लॉकडाऊनच्या काळात सायबर ३३३ गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 4:16 PM

१५२ जणांना अटक

 

मुंबई :  लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली असून राज्यात आतापर्यंत  ३३३ गुन्हे दाखल केले आहेत.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.

टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये  ज्या ३३३ गुन्ह्यांची  नोंद झाली आहे त्यापैकी १३ गुन्हे अदखलपात्र आहेत.त्यामध्ये बीड २९, पुणे ग्रामीण २७, जळगाव २६, मुंबई २०, कोल्हापूर १६, सांगली १२, नाशिक ग्रामीण १२, नाशिक शहर ११, जालना ११, सातारा १०, बुलढाणा १०, लातूर १०, नांदेड ९, पालघर ९,ठाणे शहर ८,परभणी ८, सिंधुदुर्ग ७, नवी मुंबई ७, अमरावती ७, ठाणे ग्रामीण ७, हिंगोली ६,नागपूर शहर ६, गोंदिया ५, सोलापूर ग्रामीण ५, पुणे शहर ४, रत्नागिरी ४ ,सोलापूर शहर ४, नागपूर ग्रामीण ४, भंडारा ३, चंद्रपूर ३, पिंपरी- चिंचवड ३,रायगड २, धुळे २, वाशिम २, औरंगाबाद १ (एन.सी),यवतमाळ १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १३८ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १२५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,titktok विडिओ शेअर प्रकरणी १० गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ६ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले असून  आतापर्यंत १५२ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी ६० आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .

पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद झाली आहे ,त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील नोंद केलेल्या गुन्ह्यांची संख्या २७ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपी महिलेने आपल्या फेसबुक पोस्टवर कोरोना महामारीबाबत चुकीची माहिती असणारी व अफवा पसरविणारी पोस्ट शेअर केली होती .

टॅग्स :सायबर क्राइमकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस