३३६ किमीचे रस्ते स्वच्छ, २२७ प्रभागांमध्ये मोहीम

By जयंत होवाळ | Published: May 25, 2024 08:03 PM2024-05-25T20:03:33+5:302024-05-25T20:04:12+5:30

गेल्या २७ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे.संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये ही मोहीम सुरू आहे. 

336 km roads clean, campaign in 227 wards | ३३६ किमीचे रस्ते स्वच्छ, २२७ प्रभागांमध्ये मोहीम

file photo

मुंबई : महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागात विविध ठिकाणी शनिवारी राबवलेल्या सखोल स्वच्छता मोहीमेत एकाच दिवसात १३० मेट्रिक टन राडारोडा (डेब्रीज), ३० मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ७९ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तर, ३३६ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले. गेल्या २७ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे.संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये ही मोहीम सुरू आहे. 

सखोल स्वच्छता मोहीमे अंतर्गत आज सुमारे ३३६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर ब्रशिंग करून धूळ काढण्यात आली. १ हजार ५४३ कामगार- कर्मचाऱ्यांनी १९६ संयंत्राच्या सहाय्याने ही कामगिरी केली. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी विविध वाहने आणि फायरेक्स मशील, मिस्टींग मशीन आणि अन्य अद्ययावत यंत्रणाही दिमतीला होती.

पी - दक्षिण विभागात कृष्णवाटिका मंदीर परिसर, टी विभागात मुलुंड पश्चिम येथील डॉ. आर. आर. मार्ग, आर दक्षिण विभागात कांदिवली (पश्चिम) येथे मिलाफ सिनेमागृह परिसर, स्वामी विवेकानंद मार्ग, एम पूर्व विभागात वामन तुकाराम पाटील मार्ग, के पश्चिम विभागात व्ही. एम. मार्ग, एल विभागात कुर्ला पूर्व येथे हशू आडवाणी चौक, शिवसृष्टी मार्ग, आर उत्तर विभागात दहिसर पूर्व येथे गणपत पाटील नगर, के पूर्व विभागात प्रभाग ७८ मध्ये झोपडपट्टी व तत्सम परिसर, पी उत्तर विभागात टाईम्स ऑफ इंडिया पूल परिसर, एस विभागात टागोर नगर, ए विभागात चर्चगेट येथील विठ्ठल ठाकरसी मार्ग, ज्ञानसम्राट मार्ग, डी विभागात श्रीमद् राजचंद्र मार्ग, गगनगिरी महाराज मठ ते तांबे चौक, एच पूर्व विभागात सांताक्रुज येथे कलिना जंक्शन ते रझाक जंक्शन, एच पश्चिम विभागात खार येथील चित्रकार धुरंदर मार्ग, आर दक्षिण विभागात ठाकूरगाव, समता नगर, एफ उत्तर विभागात प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, जी उत्तर विभागात माहीम कोळीवाडा, रेती बंदर, कॉज वे आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

Web Title: 336 km roads clean, campaign in 227 wards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई