Join us

३४ हजार २४७ वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:06 AM

मुंबई : महावितरणच्या भांडुप परिमंडलातील ग्राहकांच्या वीजबिलाची थकबाकी एकूण ५८३ कोटींवर पोहोचली आहे. परिणामी मुख्य कार्यालयाच्या आदेशानूसार थकीत वीजबिल ...

मुंबई : महावितरणच्या भांडुप परिमंडलातील ग्राहकांच्या वीजबिलाची थकबाकी एकूण ५८३ कोटींवर पोहोचली आहे. परिणामी मुख्य कार्यालयाच्या आदेशानूसार थकीत वीजबिल असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू झाली आहे. त्यानुसार, १८ जूनपासून ३४,२४७ ग्राहकांचा वीजपुरवठा थकीत बिलापोटी खंडित करण्यात आला.

मागील काळात भांडुप परिमंडलातील ६४.२८ कोटी थकबाकीपोटी ७४,६८९ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला. ०.२९ कोटी थकबाकीमुळे ६८९ कृषी ग्राहकांचा तर १३४.२६ कोटी थकबाकीमुळे ४०१७ इतर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील २१६४ ग्रामपंचायतींकडे १३० कोटी स्ट्रीट लाईटची थकबाकी आहे.

* ...तर मीटर काढण्याची कारवाई

आर्थिक स्थिती लक्षात घेता वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करावा लागत आहे. दररोज १०-१५ हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. बिल भरले नाहीत तर वीज मीटर काढण्याची कारवाई होऊ शकते. वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.

- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, भांडुप परिमंडल, महावितरण

* थकित वीजबिलामुळे खंडित झालेला पुरवठा

परिसर आणि ग्राहक

भांडुप २८६९

मुलुंड २७१५

ठाणे - १ : २००८

ठाणे - २ : १९३८

वागळे इस्टेट ३४३८

नेरूळ : २६१४

पनवेल शहर ५३७६

वाशी ३३०८

अलिबाग २०३२

गोरेगाव २५१५

पनवेल ग्रामीण २९०९

रोहा २५२५

.............................