Join us

राज्यात काेराेनाचे ३४ हजार ७२० सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:08 AM

मुंबई : राज्यात साेमवारी दिवसभरात २ हजार २१६ काेराेना रुग्णांचे निदान झाले असून १५ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची ...

मुंबई : राज्यात साेमवारी दिवसभरात २ हजार २१६ काेराेना रुग्णांचे निदान झाले असून १५ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची संख्या २० लाख ४६ हजार २८७ झाली असून बळींचा आकडा ५१ हजार ३२५ झाला आहे. मार्च महिन्यांनंतर पहिल्यांदा दिवसभरात १५ मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात दिवसभरात ३ हजार ४२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण १९ लाख ५८ हजार ९७१ रुग्ण काेराेनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७३ टक्के झाले असून सध्या ३४,७२० सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील मृत्युदर सध्या २.५१ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात १ लाख ६७ हजार ७६४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १ हजार ९७६ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.