मुंबईतील ३४० सागरी जलचर प्रजातींना ‘आय नॅचरलिस्ट’ संकेतस्थळाची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 05:20 AM2019-05-14T05:20:20+5:302019-05-14T05:20:33+5:30
वाढते प्रदूषण, नदी, नाल्यातून येणारे सांडपाणी थेट समुद्रामध्ये सोडले जात असूनही मुंबईतल्या काही समुद्री प्रजाती आजही तग धरून आहेत.
मुंबई : वाढते प्रदूषण, नदी, नाल्यातून येणारे सांडपाणी थेट समुद्रामध्ये सोडले जात असूनही मुंबईतल्या काही समुद्री प्रजाती आजही तग धरून आहेत. समुद्री जीव संशोधकांनी दोन हजार सागरी जलचर प्रजातींची नोंद ‘आय नॅचरलिस्ट’ या संकेतस्थळावर केली. त्यातील ३४० प्रजातींच्या जलचरांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. तसेच आय नॅचरलिस्ट या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकेतस्थळाने ही मोहर उमटवली आहे.
‘मरिन लाईफ आॅफ मुंबई’ ही संस्था मुंबईतील किनाऱ्यांवरील जलचर प्रजातींचा अभ्यास करते. दोन वर्षांच्या अभ्यासात या संस्थेने आतापर्यत दोन हजाराहून अधिक मुंबईच्या किनाºयावर जलचर प्रजाती आढळून आल्या आहेत. याबाबची माहिती त्यांनी आय नॅचरलिस्ट संकेतस्थळाकडे पाठविली. त्यानुसार संकेतस्थळाच्या तज्ज्ञांनी जलचर प्रजातींचा अभ्यास करून त्यातील ३४० प्रजातींना मान्यता दिली आहे. मरिन लाईफ आॅफ मुंबई ही संस्था संशोधनासह जनजागृती व संवर्धनासाठी महिन्यातून एकदा मुंबईच्या विविध चौपाट्यांवरील जैवविविधतेची भेट घडवून आणते.
मरिन लाईफ आॅफ मुंबईचे समुद्री जीव अभ्यासक प्रदीप पाताडे यांनी या संदर्भात सांगितले की, ेसंस्थेतर्फे गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, हाजी अली, वांद्रे कार्टर रोड, बॅण्ड स्टँण्ड, वर्सोवा बीच, मढ जेट्टी, आक्सा बीच, गोराई खाडी या भागांतील समुद्री जैवविविधतेची माहिती दिली जाते. आय नॅचरलिस्ट या अॅपचा बराच फायदा होतोय. आय नॅचरलिस्ट हा ओपन डाटा आहे, तो कोणतीही व्यक्ती वापरू शकते. संस्थेच्यामाध्यमातून दोन हजाराहून अधिक समुद्री प्रजातींची नोंद केली आहे. त्यातील ३४० प्रजातींची माहिती आय नॅचरलिस्ट या अॅपवर त्याची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.