Join us

मुंबईत काेराेनाचे ३४ हजार रुग्ण उपचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:06 AM

दिवसभरात १,२४० रुग्णांचे निदान; ४८ मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत सध्या ३४ हजार २८८ रुग्ण उपचाराधीन असल्याची ...

दिवसभरात १,२४० रुग्णांचे निदान; ४८ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत सध्या ३४ हजार २८८ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. दिवसभरात २ हजार ५७८ रुग्ण बरे झाले असून ६ लाख ३९ हजार ३४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्के झाला आहे.

१० ते १६ मेपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२८ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २४६ दिवसांवर आला आहे. मुंबईत सोमवारी १ हजार २४० रुग्णांचे निदान झाले असून ४८ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ८९ हजार ९३६ झाली असून बळींचा आकडा १४ हजार ३०८ झाला आहे.

मुंबईतील झोपडपट्टी आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेंनमेंट झोन ७७ असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ३११ इतकी आहे. मागील २४ तासात पालिकेने रुग्णांच्या सहवासातील १२ हजार ७५४ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.

.......................