Join us

जिल्ह्यातील प्रलंबित ३४६ खटले निकाली

By admin | Published: July 04, 2014 3:43 AM

जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये सुमारे ३४६ प्रलंबित खटले दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व तडजोडीने लोक न्यायालयाद्वारे निकाली काढण्यात आले.

ठाणे : जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये सुमारे ३४६ प्रलंबित खटले दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व तडजोडीने लोक न्यायालयाद्वारे निकाली काढण्यात आले.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशाने ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयासह जिल्ह्यातील ११ तालुका न्यायालयांमध्ये लोक न्यायालयाचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील सुमारे दोन हजार ९७ प्रलंबित खटले सुनावणीसाठी या न्यायालयात ठेवले होते. त्यातून सुमारे ३४६ खटल्यांना निकाली काढण्यात यश मिळाल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे जिल्हा सदस्य अ‍ॅड. टी.एम. कोचेवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दोन्ही पक्षकारांमधील सामंजस्य व एकमताच्या साहाय्याने तडजोड करून या खटल्यांना निकाली काढणे शक्य झाले आहे. लोक न्यायालयांचे औचित्य साधून ठाणे, कल्याण, वसई, पालघर, भिवंडी, डहाणू, जव्हार, मुरबाड, शहापूर, उल्हासनगर, वाडा आणि वाशी-सीबीडी या न्यायालयांतही खटले निकाली काढले. (प्रतिनिधी)