पालिकेचा शिक्षणासाठी ३,४९७ कोटींचा अर्थसंकल्प
By रेश्मा शिवडेकर | Published: February 2, 2024 01:36 PM2024-02-02T13:36:48+5:302024-02-02T13:37:55+5:30
पालिकेच्या प्रशासकीय राजवटीत सादर होणारा हा दुसरा अर्थसंकल्प आहे.
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेने २०२४-२५ या वर्षाकरिता एकूण ३,४९७ कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला. पालिकेच्या प्रशासकीय राजवटीत सादर होणारा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. गेल्या वर्षी पालिकेने ३,३४७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता.
बजेटमध्ये २६६.७७ कोटी इतकी तरतूद पालिका शाळांच्या दुरूस्ती व बांधकामाकरिता करण्यात आली आहे. शाळांची स्वच्छता, देखभालीसाठी १४० रूपये खर्चण्यात येणार आहेत. तसेच, पालिकेच्या शाळांमधील १,३०० वर्गखोल्या डिजिटल करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण २५.३३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या टॅब, ईवाचनालय या सुविधांकरिता ९५ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पालिकेत दरवर्षी आयोजिण्यात ेयणाऱया चित्रकला स्पर्धेकरिता ७० लाखांचा निधी देण्यात आला आहे. खगोलशास्त्रीय प्रयोगशाळेसाठी १.७५ कोटींची तरतूद कऱण्यात आली आहे.
नव्या योजना किचन गार्डन - १०० शाळा
सुमारे १.७० लाख विद्यार्थ्यांना मॉडर्न स्कूल डिक्शनरी व शिक्षकांना शब्दकोश - ४.६९ कोटी
व्याकरणाची पुस्तके - नववी-दहावीच्या १९ हजार विद्यार्थ्यांना
गणित व विज्ञान केंद्र - ४,५० कोटी
ग्रंथालयाकरिता पुस्तके - ७५ लाख
खुली व्यायामशाळा - २०० शाळा
माध्यमिक शाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य - २.८१ कोटी
अर्थसंकल्प - ३,४९७ कोटी
महसूली खर्च - ३१६७ कोटी
भांडवली खर्च - ३३० कोटी
चार नव्या सीबीएसई शाळा
पालिकेच्या सीबीएसई, आयसीएसईच्या १२ शाळांमध्ये दुसरी ते सहावीपर्यंत दुसरी तुकडी सुरू केली जाईल. आणखी चार पालिका वॉर्डमध्ये चार सीबीएसईच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत.
सुमारे तीन लाख विद्यार्थी
पालिकेतर्फे ८ माध्यमांच्या ९४३ प्राथमिक शाळेत एकुण २ लाख ४४ हजार १५२ विद्यार्थी शिकतात. तर माध्यमिक शाळेत ४३ हजार विद्यार्थी शिकत आहेत.