वांद्रय़ात पकडलेले 35 लाख निवडणुकीत वाटण्यासाठी?
By admin | Published: October 1, 2014 02:24 AM2014-10-01T02:24:43+5:302014-10-01T02:24:43+5:30
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्राप्तिकर खात्याने 1क् दिवसांपूर्वीच स्थापन केलेल्या दक्षता पथकाने सोमवारी मुंबईत एका व्यक्तीला कारमधून 35 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन जाताना पकडले.
Next
>डिप्पी वांकाणी - मुंबई
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्राप्तिकर खात्याने 1क् दिवसांपूर्वीच स्थापन केलेल्या दक्षता पथकाने सोमवारी मुंबईत एका व्यक्तीला कारमधून 35 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन जाताना पकडले. प्राथमिक तपासात हे पैसे राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणार होते की नाही, याबाबत नेमका खुलासा होऊ शकला नाही. पण ती व्यक्ती हे पैसे कोठून आणले आणि कोणाला पोहोचवले जात होते याबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकली नाही; म्हणून प्राप्तिकर खात्याने पैसे जप्त केले आहेत.
प्राप्तिकर खात्याच्या दक्षता पथकाने सोमवारी सायंकाळी वांद्रे (पश्चिम) येथे एका व्यक्तीला कारमधून 35 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन जाताना पकडले. चौकशीत त्याने सांगितले की तो बांधकाम व्यायसायिक असून गुजरातमधील भूज येथील एका लेबर कॉन्ट्रॅक्टरला त्याने पुरवलेल्या सेवेच्या मोबदल्यात देण्यासाठी ही रक्कम घेऊन जात होता.
मात्र स्वत:चे नाव आणि त्याच्याकडे इतके पैसे कोठून आले, याबाबत त्याने दिलेली उत्तरे समाधानकारक नव्हती. त्यामुळे त्या व्यक्तीला प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींनुसार ताब्यात घेऊन त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक तपास करून पैसा निवडणुकीत वापरला जाणार होता का, याची खातरजमा केली जाईल, असे प्राप्तिकर खात्याच्या अधिका:यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही प्राप्तिकर खात्याने मुंबईतील एका बिल्डरला मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम घेऊन जाताना पकडले होते. पण तपासात असे निष्पन्न झाले की वरळीतील एका प्रतिस्पर्धी बिल्डरने त्याला गोवण्यासाठी हेल्पलाइनवर खोटी माहिती दिली होती.
च्या निवडणुकीत पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने 2क् सप्टेंबर रोजी प्राप्तिकर खात्यांतर्गत दक्षता पथकाची स्थापना केली.
च्तसेच नागरिकांनी आपल्या आसपास होत असलेल्या घडामोडींची माहिती द्यावी, यासाठी क्22-22635511, क्22-22627275 आणि 18क्क्-क्22-क्115 या क्रमांकांवर विनाटोल हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली.