मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे ३५% काम पूर्ण; २०२२ ला काम पूर्ण होणार, प्रवाशांचा वेळ वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 12:52 AM2020-12-05T00:52:34+5:302020-12-05T00:52:54+5:30

काम करताना पर्यावरणाची काळजी घेण्यात येत आहे.  हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ तसेच इंधन वाचणार आहे. मुंबईचा वेग वाढणार आहे. मुंबईतून नवी मुंबईला जाणे आणि येणे सोपे होणार आहे. थोडक्यात प्रवास वेगवान होणार आहे.

35% work of Mumbai Transharbour Link completed; The work will be completed by 2022, saving passengers time | मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे ३५% काम पूर्ण; २०२२ ला काम पूर्ण होणार, प्रवाशांचा वेळ वाचणार

मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे ३५% काम पूर्ण; २०२२ ला काम पूर्ण होणार, प्रवाशांचा वेळ वाचणार

Next

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतलेले मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम ३५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे २०१८ साली सुरू झालेले हे काम सप्टेंबर २०२२ साली पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा मार्ग नवी मुंबई, रायगड, मुंबई, पुणे महामार्गाला जोडला जाईल.

एमटीएचएल, शिवडी-वरळी उन्नत मार्ग, विरार-अलिबाग कॉरिडॉर, मीरा-भाईंदर कोस्टल रोड या प्रकल्पांद्वारे येत्या दहा वर्षांत महानगर क्षेत्रात रिंगरूट तयार होणार असून यावरून विनासिग्नल प्रवास करता येईल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि प्राधिकरणाचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी शुक्रवारी लिंकचा पाहणी दौरा आयोजित केला होता. या वेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. 

शिंदे म्हणाले, कोरोनाकाळात काम विलंबाने होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. लिंकचे काम तीन टप्प्यांत सुरू आहे. कोरोनाकाळात कामगारांच्या सुरक्षेवर भर देण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. लिंकचे काम ३५ ते ४० टक्के झाले असून, काम करताना पर्यावरणाची काळजी घेण्यात येत आहे.  हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ तसेच इंधन वाचणार आहे. मुंबईचा वेग वाढणार आहे. मुंबईतून नवी मुंबईला जाणे आणि येणे सोपे होणार आहे. थोडक्यात प्रवास वेगवान होणार आहे.

आर.ए. राजीव यांनीदेखील काम वेगाने सुरू असल्याचा दावा केला. काम ३५ ते ४० टक्के पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला. मुळात हे काम २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे आणि एकदा का हे काम पूर्ण झाले तर भविष्यात मुंबईचा वेग वाढणार आहे. प्रवास वेगवान होणार आहे. मात्र या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना टोल आकारण्यात येईल. प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी याबाबतचा निर्णय होईल.

  • नवी मुंबई विमानतळालाही हा मार्ग जोडण्यात येणार
  • फ्लेमिंगोंसाठी साउंड बॅरिअर लावणार
  • जपानच्या कंपनीचे ऑर्थोट्रॉपिक तंत्रज्ञानाचा वापर
  • १७ हजार ८४३ कोटी एकूण प्रकल्प किंमत
  • भारतात तसेच जगातला सर्वात जास्त लांबीचा सागरी सेतू

Web Title: 35% work of Mumbai Transharbour Link completed; The work will be completed by 2022, saving passengers time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.