‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’च्या वतीने प्रजासत्ताक दिनी हिंदवी स्वराज्याची ३५० वर्षे अभिनव पद्धतीने साजरी

By सचिन लुंगसे | Published: January 26, 2024 09:25 PM2024-01-26T21:25:46+5:302024-01-26T21:26:12+5:30

Mumbai: २०२३-२४ वर्ष हे हिंदवी स्वराज्याचे ३५० वे वर्ष. या निमित्ताने महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’च्या वतीने महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध ३७३ गडकिल्ल्यांवर भारतीय तिरंगा व स्वराज्याची भगवी पताका अर्थात भगवा ध्वज फडकविण्याचा तसेच शिवप्रतिमा पूजनाचा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.

350 years of Hindu Swarajya was celebrated in an innovative way on Republic Day on behalf of 'Akhil Maharashtra Climbing Federation' | ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’च्या वतीने प्रजासत्ताक दिनी हिंदवी स्वराज्याची ३५० वर्षे अभिनव पद्धतीने साजरी

‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’च्या वतीने प्रजासत्ताक दिनी हिंदवी स्वराज्याची ३५० वर्षे अभिनव पद्धतीने साजरी

मुंबई - श्री शिव छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य म्हणजे आपल्या सर्वांचा अभिमान. २०२३-२४ वर्ष हे हिंदवी स्वराज्याचे ३५० वे वर्ष. या निमित्ताने महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’च्या वतीने महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध ३७३ गडकिल्ल्यांवर भारतीय तिरंगा व स्वराज्याची भगवी पताका अर्थात भगवा ध्वज फडकविण्याचा तसेच शिवप्रतिमा पूजनाचा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.

२६ जानेवारी २०२४ रोजी, भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. यात १० हजारहुन अधिक शिवप्रेमींनी सहभाग नोंदविला. सोबतीला केंद्र सरकारचे पुरातत्व खाते, राज्य सरकारचे पुरातत्व खाते, स्थानिक पोलीस प्रशासन व इतर अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाले. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्यकारी अध्यक्ष ऋषिकेश यादव, सचिव डॉ. राहुल वारंगे, सहसचिव राहुल मेश्राम, खजिनदार दीपाली भोसले यांच्यासह तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.

हा उपक्रम अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या सर्व जिल्हा शाखा, गिर्यारोहण संस्था, शिवप्रेमी संस्था यांच्या माध्यमातून आणि तमाम शिवप्रेमी कार्यकर्ते यांच्या सहभागातून यशस्वीरीत्या संपन्न झाला. यासाठी किल्ल्यांची वेगवेगळ्या विभागात विभागणी करून विभाग निहाय ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली होती. हा उपक्रम महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील, जगाच्या कानाकोपऱ्यातील शिवभक्तांसाठी खुला ठेवण्यात आला होता.  यामध्ये महासंघाकडे नाव नोंदणी करून आपल्या जिल्ह्यातील किल्ल्यावर जाऊन शिवप्रेमी या उपक्रमामध्ये सहभागी झाले.

याविषयी बोलताना महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे म्हणाले, “श्री शिव छत्रपती हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान. सर्वसमावेशक हिंदवी स्वराज्याची त्यांनी पायाभरणी केली. या भक्कम पायावरच आजची भारतीय लोकशाही मजबूतपणे उभी आहे. या हिंदवी स्वराज्याचे २०२३-२४ वर्ष हे ३५० वे वर्ष. त्यानिमित्ताने महाराष्ट्रभरच नव्हे तर जगभरात विविध अभिनव उपक्रम शिवप्रेमींनी हाती घेतले आहेत. तसाच हा उपक्रम महासंघाद्वारे घेण्यात आला होता. जेणेकरून महाराजांचे स्वराज्य, त्याची साक्ष देणारे गडकिल्ले व साहसाची सांगड घालणारे कडे कपारीतील निसर्ग सौंदर्य. या सर्वांना एका धाग्यात गुंफणारा हा उपक्रम होता या उपक्रमाला तमाम शिवप्रेमींनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे.

गिर्यारोहण, साहस व शिवरायांचा जाज्वल्य इतिहास यांची सांगड अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ नेहमीच घालत असतो व त्यातून नवनवीन अभिनव उपक्रम राबवत असतो. हा देखील त्यांपैकीच एक उपक्रम होता.
 

Web Title: 350 years of Hindu Swarajya was celebrated in an innovative way on Republic Day on behalf of 'Akhil Maharashtra Climbing Federation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.