नुसतीच घोषणा... अद्याप ३५ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचितच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 11:16 AM2022-01-29T11:16:54+5:302022-01-29T11:18:05+5:30

३१.८१ लाख शेतकऱ्यांना २० हजार कोटींची कर्जमाफी, माफीचा सर्वाधिक फायदा मराठवाडा आणि विदर्भाला

35,000 farmers are still deprived of loan waiver in maharashtra | नुसतीच घोषणा... अद्याप ३५ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचितच

नुसतीच घोषणा... अद्याप ३५ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचितच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ आतापर्यंत ३१ लाख ८१ हजार १७८ शेतकऱ्यांना  मिळाला आहे. त्यांना २० हजार २९० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. मात्र, ३५ हजार ६२९ शेतकऱ्यांना १५६ कोटी रुपयांची कर्जमाफी अद्याप मिळू शकलेली नाही. 
उद्धव ठाकरे सरकार पदारूढ झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. २८ डिसेंबर २०१९ ला कर्जमाफीचा आदेश निघाला. सर्वाधिक ७४२२ कोटी रुपयांची कर्जमाफी मराठवाड्याला, त्या खालोखाल ५३८४ कोटी रुपयांची कर्जमाफी विदर्भाला मिळाली. पश्चिम महाराष्ट्राला २८१७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा नाहीच
थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी दिली, पण नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या या सरकारच्या घोषणेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. अशा शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या शेवटच्या कर्जाच्या काही विशिष्ट टक्के रक्कम किंवा कमाल ५० हजार रुपये प्रोत्साहनपर द्यावेत, अशा दोन पर्यायांचा विचार सरकार करीत आहे. लवकरच या बाबतचे धोरण निश्चित केले जाईल, असे आश्वासन विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देण्यात आले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनातच त्या बाबतची घोषणा होईल, तोवर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागेल, अशी स्थिती आहे. 

अत्यंत पारदर्शक व गतिमान पद्धतीने कर्जमाफी देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आले. केवळ पाऊण टक्के कर्जमाफी व्हायची आहे. ती लवकरच दिली जाईल. तसेच, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णयही लवकरच घेण्यात येईल.
- बाळासाहेब पाटील, सहकार मंत्री. 

कर्जमाफीची जिल्हावार आकडेवारी 
(रक्कम कोटी रुपयात)
 विदर्भ 
nअकोला - ६३८.०५ कोटी, अमरावती - ८४४.३१, 
भंडारा - १५५.२९, बुलडाणा - ११४१.८२, चंद्रपूर - ३१९.२२, गडचिरोली - ७४.६२, गोंदिया - १०९.७९, नागपूर - ३८५.२०, वर्धा - ४६७.२७, वाशिम - ५८५.५१, 
यवतमाळ - ६६३.७८  
 मराठवाडा  
nऔरंगाबाद - ९८३.९३ कोटी रु., बीड - १५०९.६५, हिंगोली - ६०२.९५, जालना - १०४५.९२, लातूर - ३४२.८२, नांदेड - १२८०.२९, उस्मानाबाद - ५१३.४०, परभणी - ११४३.७६  
 उत्तर महाराष्ट्र 
nअहमदनगर - १७८८.५४ , जळगाव - ९१६.६७, नंदुरबार - १९२.८३, नाशिक - ११५५.१९, धुळे - ३४३.२९. 
 कोकण 
nपालघर - ७०.४०, रायगड - ४४.२५, रत्नागिरी - ६४.४०, सिंधुदुर्ग - ४१.७३, ठाणे - ८७.९३. 
 पश्चिम महाराष्ट्र 
nकोल्हापूर - २८६.४०., पुणे - १०२४.५०, सांगली - ४८१,२५, सातारा - ३७२.८२, सोलापूर - ६५२.४४. 

Web Title: 35,000 farmers are still deprived of loan waiver in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.