पालिकेचे ३५१ कोटींचे आर्थिक नुकसान

By admin | Published: May 23, 2015 01:22 AM2015-05-23T01:22:37+5:302015-05-23T01:22:37+5:30

ठाणे महापालिकेच्या लेखा परीक्षण अहवालात पालिकेच्या कामाबाबात अनेक आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

351 crores financial loss of the corporation | पालिकेचे ३५१ कोटींचे आर्थिक नुकसान

पालिकेचे ३५१ कोटींचे आर्थिक नुकसान

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या लेखा परीक्षण अहवालात पालिकेच्या कामाबाबात अनेक आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. परंतु पालिकेने या आक्षेपांची दखल न घेतल्याने पालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंत १५०० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याचा आरोप ठाणे शहर काँग्रेसने केला आहे. गेल्या आठ वर्षांत विविध त्रुटींची सुधारणा न केल्याने पालिकेला ३५१ कोटींचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
नंदलाल समितीने दिलेल्या अहवालापेक्षाही हा मोठा घोटाळा असल्याने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर राजकीय कारभाराबरोबरच पालिकेचा कारभारही वादग्रस्त ठरला आहे. विशेष म्हणजे उत्पन्न आणि खर्चाचे गणित बिघडल्याने पालिकेला अनेक प्रकल्पांना कात्री लावावी लागली. असे असताना आता काँग्रेसचे गटनेते संजय घाडीगावकर यांनी पालिकेला मागील आठ वर्षांत सुमारे ३५१ कोटी ८७ लाख ८७ हजार ३५९ रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती देत याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच कुशल ज्येष्ठ तांत्रिक तज्ज्ञ, शासनाच्या लेखा परीक्षण विभागातील दोन कर्तव्यदक्ष अधिकारी आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आदी सदस्यांची समिती नेमण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

झालेले नुकसान
आर्थिक नुकसानाची ६७,००,२९,४४१
रक्कम
वसूलपात्र रक्कम ५०,८०,५५,१९५
थकबाकी रक्कम१,०४,४७,११,१५७
नियम उल्लघंन रक्कम ३४,९०,९४,३१५
दप्तर उपलब्ध न ९४,६८,९७,२५१
करणे रक्कम
एकूण ३,५१,८७,८७,३५९

Web Title: 351 crores financial loss of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.