Join us

Mumbai Megablock: मध्य रेल्वेचा आज दुपारपासून ३६ तासांचा ब्लॉक; या रेल्वे गाड्यांवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 1:01 PM

ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या नवीन टाकलेल्या रुळांना जोडणी देण्यासाठी आणि क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी या ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. आज, शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून १० जानेवारीच्या पहाटे २ वाजेपर्यंत असा ब्लॉक असणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गाच्या कामाकरिता ठाणे-मुंब्रा स्थानकांत धिम्या मार्गावर आज, शनिवार ते सोमवार (दि. १०) असा ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत धिम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावरून वळविण्यात येणार आहेत.

ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या नवीन टाकलेल्या रुळांना जोडणी देण्यासाठी आणि क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी या ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. आज, शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून १० जानेवारीच्या पहाटे २ वाजेपर्यंत असा ब्लॉक असणार आहे.

ब्लॉककाळात धिम्या मार्गावरील लोकल ठाणे, डोंबिवली आणि दिवा येथील जलद मार्गावर थांबतील; तर कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने महापालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधून बस चालविण्याची व्यवस्था केली आहे.

मेल / एक्स्प्रेस सेवेवर होणार परिणाम

शुक्रवार आणि शनिवारी सुटणाऱ्या रद्द गाड्या

अमरावती-मुंबई एक्स्प्रेस

नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस

नांदेड – मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस

शनिवार आणि रविवारी सुटणाऱ्या रद्द गाड्या

मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस

मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस

मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस

मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेस

मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन

मुंबई-अमरावती एक्स्प्रेस

मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस

मुंबई-गदग एक्स्प्रेस

मुंबई-नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस

 

रविवार आणि सोमवारी सुटणाऱ्या रद्द गाड्या

आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस

गदग-मुंबई एक्स्प्रेस---

पुणे येथे एक्स्प्रेस गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन

हुबली-दादर एक्स्प्रेस

कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस

 

पुण्याहून एक्स्प्रेस गाड्यांची शॉर्ट ओरिजिनेशन

मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस

दादर-हुबली एक्स्प्रेस.

 

टॅग्स :रेल्वे