मुंबई : एएनसी व एनसीबीने केलेल्या विविध कारावाईत दाेन काेटींच्या चरससह ३६ किलाे गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी कुर्ल्यातील महिलेसह तीन ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली असून विलेपार्लेतून मध्य प्रदेशच्या दुकलीला बेड्या ठाेकण्यात आल्या.अमली पदार्थ नियंत्रण कक्षाची (एनसीबी) बॉलीवूडबरोबरच महानगरातील ड्रग्जविरोधातील कारवाई सुरूच आहे. याअंतर्गत कुर्ल्यातील एलटीटी येथे रविवारी रात्री एका महिलेसह तीन तस्करांना पथकाने छापा मारून अटक केली. त्यांच्याकडून ६ किलो ६२८ ग्रॅम चरस जप्त केला. मादक पदार्थांच्या बाजारात त्याची किंमत अंदाजे २ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.आफताब शेख, साबिर सय्यद व शमीम कुरेशी अशी त्यांची नावे आहेत. तिघेही कुर्ला पूर्व परिसरात राहतात. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार रविवारी रात्री पथकाने छापा मारून ही कारवाई केली. तिघांच्या घराच्या झडतीत बंदी असलेले काश्मिरी चरस जप्त करण्यात आले.दुसरीकडे मुंबईत अमली पदार्थ विरोधी पथकाने नुकतीच (एएनसी) १ कोटी १० लाख रुपयांच्या एमडीसह महिलेला अटक केली होती. त्या पाठोपाठ सोमवारी विलेपार्ले येथून ३६ किलो गांजा जप्त करण्यात आला. एएनसीच्या वांद्रे पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे यांना विलेपार्ले परिसरात दोन जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत ३६ किलो गांजा जप्त करण्यात आला. शफीउर अहमद मोहिद्दीन रेहमान (५१) आणि सबुर अहमद मोहिद्दीन खान (५१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही मूळचे मध्य प्रदेश येथील रहिवासी आहेत. दाम्पत्य घरातूनच करत होते ड्रग्ज विक्री यापूर्वी घरातून अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या सनम सय्यद या महिलेला पथकाने शुक्रवारी अटक केली. या कारवाईदरम्यान एमडी या अत्यंत घातक अमली पदार्थाचा १ कोटी १० रुपयांचा साठा आणि आठ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. सनमचा पती तारिक सय्यद हा ड्रग्जचा मोठा वितरक आहे, तर सनम किरकोळ स्वरूपात विक्री करणाऱ्यांना एमडी उपलब्ध करून देत असे. सध्या तिच्या पतीचा शोध सुरू आहे.
दाेन काेटींचे चरस; ३६ किलाे गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 4:45 AM