दरवर्षी ३६ लाख नागरिक विस्थापित, चक्रीवादळासह पुराचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 05:31 AM2020-06-07T05:31:00+5:302020-06-07T05:31:25+5:30
चक्रीवादळासह पुराचा फटका। २००८ ते २०१९ पर्यंतची आकडेवारी
मुंबई : ओव्हरसीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या अंदाजानुसार, २०३० सालापर्यंत जगभरात ३२.५ कोटी नागरिकांवर जागतिक तापमान वाढीशी संबंधित आपत्तींचे संकट घोंगावणार असतानाच २००८ ते २०१९ या काळात भारतात दरवर्षी सरासरी ३६ लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. यामागचे प्रमुख कारण मान्सूनमुळे आलेला पूर, तर दुसरे चक्रीवादळ आहे.
अम्फान चक्रीवादळामुळे मे २०२० मध्ये आलेल्या पश्चिम बंगाल, ओडिशा येथील १.९ कोटी नागरिक विस्थापित झाले. तर १.७ कोटी नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली. नुकतेच मुरुड येथे धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळेही भरून न येणारी हानी झाली.
स्टेट आॅफ इंडियाज एन्व्हायर्न्म$ेंट इन फिगर्स २०२० अहवालानुसार, २०१९ मध्ये जगभरात २४.९ कोटी नागरिक विस्थापित झाले. यातील २३.९ कोटी नैसर्गिक आपत्तीमुळे विस्थापित झाले. या नैसर्गिक आपत्तीमध्ये चक्रीवादळ, वादळ आदींमुळे विस्थापित होणाऱ्यांची संख्या १.१९ कोटी आहे. आयपीसीसी म्हणजे इंटरगव्हर्नमेंटल पॅनल आॅन क्लायमेट चेंजने १९९० मध्येच म्हटले होते की, जागतिक तापमान वाढीचा परिणाम हा पलायन आणि विस्थापनाच्या माध्यमातून समोर येईल. याची प्रचिती सध्या पाहायला मिळत आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार २०२० पर्यंत २० कोटी नागरिक विस्थापित होतील. डिसेंबर २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड मायग्रेशन अहवाल २०२० नुसार प्रत्येक वर्षी हिंसा, संघर्ष यांच्या तुलनेत नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिक मोठ्या संख्येने विस्थापित होत आहेत.
२० टक्के नागरिक भारतातील
जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, २०१९ मध्ये जगभरात जेवढे नागरिक विस्थापित झाले त्यात २० टक्के नागरिक भारतातील होते.
२०१९ मध्ये भारतात ५० लाख नागरिक केवळ जागतिक तापमान वाढीमुळे आलेल्या आपत्तीमुळे विस्थापित झाले.
कोणत्या वादळात
किती नागरिक झाले विस्थापित