घाटकोपरमधील ३६ तबेले अनधिकृत!

By admin | Published: May 26, 2014 03:46 AM2014-05-26T03:46:51+5:302014-05-26T03:46:51+5:30

पालिकेच्या घाटकोपर येथील ‘एन’ विभागाच्या हद्दीत ३६ अनधिकृत तबेले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे

36 stables in Ghatkopar unauthorized! | घाटकोपरमधील ३६ तबेले अनधिकृत!

घाटकोपरमधील ३६ तबेले अनधिकृत!

Next

मुंबई : पालिकेच्या घाटकोपर येथील ‘एन’ विभागाच्या हद्दीत ३६ अनधिकृत तबेले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. माहिती अधिकारातून उघड झालेल्या या माहितीत ३६ अनधिकृत तबल्यांमध्ये ४६० जनावरे ठेवण्यात आली आहेत. घाटकोपर ‘एन’ विभागाच्या हद्दीत किती अधिकृत आणि अनधिकृत तबेले आहेत, यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांनी माहिती मागवली होती. परंतु, गेली तीन वर्षे पालिकेच्या आरोग्य विभागाने ही आकडेवारी देण्यासाठी टाळाटाळ केली़ यामुळे माहिती आयुक्तांकडे यासंदर्भात विचारणा केल्यावर त्वरित माहिती उपलब्ध करून देण्यात आली. घाटकोपर विभागातील बलदेव पांडे, रामबिहारी यादव, बलराम यादव, अनुभवना गोसावी, नंदलाल तिवारी, बलधर देवनाथ व मालतीदेवी मौर्या हे तबेलेधारक अधिकृत असल्याची माहिती उघड झाली आहे.

Web Title: 36 stables in Ghatkopar unauthorized!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.