राज्यात ३६ हजार २०१ रुग्ण उपचाराधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:07 AM2021-02-16T04:07:41+5:302021-02-16T04:07:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात ३,१०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत एकूण १९,७८,७०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात ३,१०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत एकूण १९,७८,७०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७ टक्के आहे. सध्या राज्यात ३६,२०१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात साेमवारी ३,३६५ नवीन रुग्णांचे निदान आणि २३ मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५३,५९,०२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.४६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,७४,७०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १,७१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. २३ मृत्यूंमध्ये मुंबई ३, नवी मुंबई मनपा १, रायगड ११, पनवेल मनपा १, नाशिक मनपा १, रत्नागिरी १, औरंगाबाद मनपा २, अमरावती मनपा १, नागपूर १, नागपूर मनपा १ या रुग्णांचा समावेश आहे.
............................