365 गोविंदा जखमी
By admin | Published: August 20, 2014 01:26 AM2014-08-20T01:26:22+5:302014-08-20T01:26:22+5:30
सोमवारी साज:या झालेल्या दहीहंडी उत्सवामध्ये मुंबईतील एकूण 365 गोविंदा जखमी झाले असून, त्यापैकी 31 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Next
मुंबई : सोमवारी साज:या झालेल्या दहीहंडी उत्सवामध्ये मुंबईतील एकूण 365 गोविंदा जखमी झाले असून, त्यापैकी 31 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र सोमवारी गंभीर असणा:या गोविंदांचीही प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
सायन रुग्णालयामध्ये सध्या 9 गोविंदा दाखल आहेत. 22 वर्षीय प्रवीण यादव या गोविंदाची प्रकृती सोमवारी गंभीर होती. मात्र मंगळवारी प्रवीणची प्रकृती स्थिर झाली आहे. डॉक्टरांच्या देखरेखीसाठी त्याला इमजर्न्सी विभागात ठेवण्यात आले आहे.
देविदास महाले या 42 वर्षीय गोविंदाच्या डोक्याला मार बसला आहे. त्याची प्रकृती थोडी नाजूक आहे. मात्र तो उपचारांना प्रतिसाद देत आहे. पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये त्याची प्रकृती स्थिर होईल, असे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तेराही गोविंदांची प्रकृती आता स्थिर आहे. मणक्याला फ्रॅक्चर झालेल्या गोविंदाच्या प्रकृतीत आता सुधारणा दिसून येत आहे. इतर रुग्णांना हाता-पायाला फ्रॅक्चर अथवा जखमा आहेत, त्या गोविंदांवर उपचार सुरू आहेत, असे केईएमच्या अधिका:यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
गोविंदांनी पैसे घेतलेच!
च्दहीहंडी उत्सव हा प्रसिद्धीसाठी आणि पैशांसाठी साजरा केला जाणारा उत्सव आहे, असे म्हणणा:यांचे तोंड गप्प करण्यासाठी दहीहंडी समन्वय समितीने यंदा गोविंदा पथके पैशाच्या स्वरूपात बक्षिसी स्वीकारणार नाहीत, असे जाहीर केले होते. मात्र नामांकित गोविंदा पथकांनीदेखील ते स्वीकारल्याची माहिती मिळाली.
च्गेल्या वर्षीर्पयत लाखो रुपये घेणा:या गोविंदा पथकांनी यंदा हजारो रुपयेच घेतले आहेत. पथकांना दहीहंडीच्या दिवशी येणारा खर्च हा दोन ते अडीच लाख इतका असतो. तर लहान पथकांना 5क् ते 75 हजार रुपये असतो. हा खर्च लक्षात घेतल्यावर पैशाच्या स्वरूपात बक्षिसे स्वीकारली गेली, असे काहींचे मत आहे.