नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३६५ जणांना ठोकल्या बेड्या; मुंबईत २११ गुन्हे दाखल, वाहनेही होताहेत जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 02:33 AM2020-03-29T02:33:39+5:302020-03-29T06:22:29+5:30

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मार्च ते २७ मार्च पर्यंत मुंबईत २११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

365 person in violation of the rules; 211 crimes were registered in Mumbai, vehicles were seized | नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३६५ जणांना ठोकल्या बेड्या; मुंबईत २११ गुन्हे दाखल, वाहनेही होताहेत जप्त

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३६५ जणांना ठोकल्या बेड्या; मुंबईत २११ गुन्हे दाखल, वाहनेही होताहेत जप्त

Next

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपायांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या सात दिवसांत २११ गुन्हे दाखल झाले आहेत़ ३६५ जणांना अटक करण्यात आली आहे. २७ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. वारंवार बजावून देखील घराबाहेर पडणाºया अशा मुंबईकरांची वाहनेही जप्त करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी घरीच रहा असे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मार्च ते २७ मार्च पर्यंत मुंबईत २११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात, कोरोनाचे संशयित म्हणून दोन आठवड्यासाठी घरी राहण्याच्या सूचना देऊनही घराबाहेर भटकणाºया २ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आतापर्यंतच्या दाखल गुह्यांत ३६५ जणांना अटक करण्यात आली आहे. तर २२ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. यात ४८ आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आले़ तर ३०० जणांना जामिनावर सोडून देण्यात आले आहे. तर, हॉटेल आस्थापना १७, पान टपरी ७, इतर दुकाने ४१, हॉकर्स/ फेरीवाले १२, सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी १०० तर अवैध वाहतूक प्रकरणी ३२ गुह्यांची नोंद आहे.

वाहनेही होताहेत जप्त...

नागरिकांना वारंवार बाजावून देखील बरिचशी मंडळी विनाकारण बाहेर पडताना दिसत आहेत. अशा नागरिकांची वाहनेच पोलिसांनी जप्त करण्यास सुरुवात केली आहे. अनेकदा काही मंडळीना सांगून देखील ते ऐकत नाही. पोलिसांशी वाद घालतात त्यांची थेट वाहनेच जमा करण्याबाबतचे आदेश पोलीस आयुक्तांकडून देण्यात आले आहे. त्यानुसार, टोल नाक्यांसह बाजार परिसरात पोलीस वाहनेही जमा करून घेत आहे. तर दुचाकीस्वारांची चावी जप्त करण्यात येत आहै. जेणेकरून ते बाहेर पडू नयेत़

Web Title: 365 person in violation of the rules; 211 crimes were registered in Mumbai, vehicles were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.