३६८ शाळांचा निकाल १०० टक्के

By admin | Published: June 18, 2014 03:40 AM2014-06-18T03:40:16+5:302014-06-18T03:41:57+5:30

जिल्ह्यात असणाऱ्या १ हजार ५६१ शाळांच्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी सुमारे ३६८ शाळांनी निकालाची सरासरी १०० टक्के गाठली आहे

368 School Result 100% | ३६८ शाळांचा निकाल १०० टक्के

३६८ शाळांचा निकाल १०० टक्के

Next

ठाणे : जिल्ह्यात असणाऱ्या १ हजार ५६१ शाळांच्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी सुमारे ३६८ शाळांनी निकालाची सरासरी १०० टक्के गाठली आहे. मुंबई विभागामध्ये ११ हजार ५०९ मुलांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. तर, २७ हजार ५८० मुलांना ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. ४० हजार २६६ मुलांना प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होता आले आहे.
४भाषा विषयांमध्ये सिंधी ही प्रथम भाषा घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी जोरदार बाजी मारली आहे. सिंधी भाषेत ९७.४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्या खालोखाल इंग्रजीमध्ये ९६.९१, मराठी ९७.१७, हिंदी ९४.७४ , उर्दू ९४.९१, गुजराथी ९६.८७, कन्नड ९४.२८, तमिळ ७४.५०; तेलुगूमध्ये ८८.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, बंगाली आणि पंजाबी या भाषा प्रथम व द्वितीय स्वरूपात अनुक्रमे ३ आणि ५ जणांनी घेतली होती. त्यापैकी एकही विद्यार्थी पास झालेला नाही.
४दुय्यम भाषेमध्ये हिंदी-संस्कृत घेणाऱ्या मुलांची मक्तेदारी हिंदी-पाली, हिंदी-अरबी आणि हिंदी-जर्मन भाषा घेणाऱ्या मुलांनी मोडीत काढली आहे. हे विषय घेणारे १०० टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. तर, हिंदी-संस्कृत ही दुय्यम भाषा घेणारे ९८.६४ टक्के विद्यार्थी पास झाले.

Web Title: 368 School Result 100%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.