लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : म्हैसाळ घटनेची उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत, राज्य सरकारला राज्यभरातील नर्सिंग होम्सना अचानक भेटी देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, राज्य सरकारने मार्च व एप्रिल् मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत, अनेक नर्सिंग होम्सवर धाडी टाकल्या. त्यातील ३,७९५ नर्सिंग होम्सने वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन केल्याचे राज्य सरकारने उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले.पुण्याचे अतुल भोसले यांनी पुण्याचे नर्सिंग होम्स नियम धाब्यावर बसवून कारभार चालवत असल्याबद्दल, न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने या जनहित याचिकेची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी लागू केली, तसेच म्हैसाळ प्रकरणाचा तपास कुठवर आला? अशी विचारणाही गेल्या सुनावणीत सरकारकडे केली. त्यानुसार, राज्य सरकारने गुरुवारी प्रतिज्ञापत्र सादर करून ३,७९५ नर्सिंग होम्सनी नियमांचे उल्लंघन केल्याचे व त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
३,७९५ नर्सिंग होम्सनी केले नियमांचे उल्लंघन
By admin | Published: May 07, 2017 5:06 AM