मुंबई : गेल्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत राज्यभरात झालेल्या जीवघेण्या अपघातांमध्ये संख्या ३७ टक्के घट झाली आहे.
जीवघेण्या अपघातांची संख्या कमी करण्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनने मोठी भूमिका बजावली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले, परंतु राज्यभरात ही आकडेवारी समान नव्हती. कारण किमान पाच जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन असूनही अपघातांच्या संख्येत किंचित वाढ झाली. जालना, वाशिम, धुळे, अमरावती (ग्रामीण) आणि जळगावसारख्या जिल्ह्यांमध्ये यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत रस्ते अपघात आणि मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढली होती.
अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले की, राज्यभरात झालेल्या जीवघेण्या अपघातांमध्ये सरासरी किमान २० टक्के घट झाली. महाराष्ट्रात अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जुलैनंतरच संख्येचा वाढता ट्रेंड दिसून आला. प्रवासावर निर्बंध असल्याने आणि गाड्या कमीतकमी पद्धतीने कार्यरत असल्याने अनेकांनी सुरक्षिततेसाठी रस्त्यावरून खासगी वाहनाने प्रवास करणे पसंत केले.
वाहतूक विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ३३६ अपघातांमध्ये ३५८ हून अधिक मृत्यू झाले होते, तर चालू वर्षाच्या आकडेवारीनुसार २१२ प्राणघातक अपघातांमध्ये २२३ जणांचा मृत्यू झाला होता. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, जीवघेण्या रस्ते अपघातांमध्ये ३६.९ टक्के घट झाली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, यंदा अपघातांची संख्या कमी झाली असली, तरी बहुतांश अपघात जीवघेणे होते. रस्ता समजून घेण्यासाठी आणि किमान रस्ते अपघात होऊ नयेत, म्हणून वाहतूक पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत आणि ब्लॅक स्पॉट आधीच शोधून काढला आहे. त्यानंतर, पोलीस अधिकाऱ्यांनी स्वयंसेवी संस्थांशी करार केला आहे, जे वाहनचालकाला शिक्षण देतील आणि रस्ता सुरक्षेचे मुद्दे मोठ्या प्रमाणावर समजून घेण्यासाठी मोहीम राबवतील.
................................