एमएचटी सीईटीत ३७ अव्वल, मिळवले १०० पर्सेंटाईल
By रेश्मा शिवडेकर | Published: June 16, 2024 08:34 PM2024-06-16T20:34:49+5:302024-06-16T20:34:58+5:30
मुंबई-राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या इंजिनीअरिंग, कृषी, फार्मसी अभ्यासक्रमाच्या एमएचटी सीईटीत ३७ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल मिळविण्याची ...
मुंबई-राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या इंजिनीअरिंग, कृषी, फार्मसी अभ्यासक्रमाच्या एमएचटी सीईटीत ३७ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल मिळविण्याची कामगिरी केली आहे.
मृदुल समीर जोशी, सन्मय विक्रम शाह, अभिषेक विरेंद्र झा, आद्या दुर्गाप्रसाद हरिचंदन, मोहम्मद इस्माईल नाईक या मुंबई-ठाण्यातील विद्यार्थ्यांनी पीसीबी विषयगटात १०० पर्सेंटाईल मिळविण्याची कामगिरी केली आहे. तर पीसीएममध्ये पुष्कर विनय ब्याडगी, मैत्रेय वाळिंबे, मोक्ष निमेश पटेल, वंशिका शहा, प्रणव अरोरा या मुंबईतील विद्यार्थ्यांनी पीसीएम गटात अव्वल यश मिळविले आहे.
अनुसूचित जाती (एससी)प्रवर्गातून पीसीबी गटात मुंबईच्या परेश किशोर क्षेत्री याने ९९.९९ पर्सेंटाईल मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर पीसीएममध्ये नागपूरच्या साना उदय वानखेडे हिने ९९.९७ पर्सेंटाईल मिळविले आहेत.
अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून पीसीबी गटात अकोल्याच्या सृजन गजानन अत्राम याने ९९.९७ पर्सेंटाईल मिळवून प्रथम येण्याची कामगिरी केली. तर पीसीएममध्ये रांचीचा सुयंश अरविंद चौहान याने ९९.९९ पर्सेंटाईल मिळविले आहेत.
रविवारी एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला. पीसीएमच्या २,९५,५७७ आणि पीसीबीच्या ३,७९,८०० अशा एकूण ६,७५,३७७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. सीईटी सेलने २२ एप्रिल ते १६ मे दरम्यान राज्यातील १४३ केंद्रांवर पीसीएम आणि पीसीबी ग्रुपची सीईटी परीक्षा घेतली.
ओबीसी प्रवर्गातील टॉपर्स (सर्वांना १०० पर्सेंटाईल)
पीसीबी ग्रुप
श्रावणी कैलाश चोटे, अहमदनगर
श्रेया विलास भोळे (अकोला)
आदेश निचट(अमरावती)
फहाद मोहम्मद कलिम अन्सारी (धुळे)
सोहम भीमराव लगड (पुणे)
पीसीएम ग्रुप
पार्थ पद्मभूषण असाती (नागपूर)
आर्यन भुरे (रांची)
निकाल पाहण्यात अडचणी
रविवारी सायंकाळी ६ वाजता निकाल सीईटी-सेलच्या वेबसाईटवर जाहीर कऱण्यात येणार होता. मात्र, सहानंतरही साईट डाऊन असल्याने अनेकांना रात्री ८ पर्यंत निकाल पाहता येत नसल्याची तक्रार पालकांनी केली.